मुंबई : Apple ने सप्टेंबर 2021 मध्ये iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या स्मार्टफोन्ससह iPhone 13 मालिका लॉन्च केली. या स्मार्टफोन्सची जगभरात चांगली मागणी होती. एका रिसर्चनुसार, क्युपर्टिनो स्थित मोठ्या विक्रेत्याने केवळ सुट्टींमध्ये कोट्यवधींचे आयफोन विकले आहेत
विश्लेषकाचा अंदाज आहे की 2022 मध्ये iPhone 13 च्या विक्रीत वाढ होईल. याचे कारण Apple कंपनीने ग्राहकांची मागणीनुसार युनिटची निर्मिती करू करू शकलेले नाही. ऍपल गेल्या तिमाहीत 12 दशलक्ष युनिट्सची मागणी पूर्ण करू शकले नाही.
त्यामुळे, पुढील दोन तिमाहीत (Q1 2022 आणि Q2 2022), ग्राहकांसाठी पुरेशा आयफोनच्या युनिटची निर्मिती करण्यात येणार आहे.
आयफोन 14 सीरीज लाँच होईपर्यंत आयफोन 13 सीरीजची मागणी कायम राहणार आहे.