मुंबई : जर तुम्हाला स्मार्टफोन (Smartphone) विकत घ्यायचा असेल तर पुढील चार दिवस तुमच्यासाठी चांगली संधी आहे. भारतातील ई-कॉमर्स कंपनी अमेझोन इंडिया (Amazon.in) 22 ते 25 मार्च दरम्यान फॅब फोन फेस्ट 2021 अंतर्गत उत्तम ऑफर देत आहे. या सेलमध्ये आपण 40 टक्के सवलतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही बँक ऑफरचा ही लाभ घेऊ शकता. त्यामध्ये ईएमआय (EMI) वर वस्तू खरेदी करण्याची सुविधा देखील आहे.
अतिरिक्त बँक ऑफरसह ही फॅब फोन फेस्ट रेडमी नोट 10 सीरीज, रेडमी 9 पॉवर आणि Mi10 खरेदी करण्याची संधी आहे.
नुकताच लाँन्च केलेला रेडमी नोट 10 प्रो मॅक्स, रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 आकर्षक ऑफरसह 22 मार्चला दुपारी 12 वाजता उपलब्ध होईल. शिओमी स्मार्टफोनच्या या एडिशनमध्ये 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआईसह खरेदी करता येईल.
या फेस्टमध्ये आपणास नवीन लॉन्च केलेल्या स्मार्टफोन सॅमसंग एम 12, सॅमसंग एम02 आणि सॅमसंग एम02s (Samsung M12, Samsung M02 and Samsung M02s) वर मोठ्या ऑफर मिळू शकतात. या ऑफरमध्ये स्मार्टफोनवर 25% पर्यंत सूट मिळते आणि 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआई सोबत उपलब्ध असणार आहे.
नुकत्याच लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम 12 वर बँक ऑफरसह 1हजार रुपयांची सवलत मिळेल. भारताचा पहिला 7000mAh स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी एम 51 स्मार्टफोनवर 6 हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
वनप्लस मॉडेलवर ग्राहकांना चांगली सूट मिळू शकते. वनप्लस नॉर्ड 29 हजार 999 रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध आहे. वनप्लस स्मार्टफोन 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही किंमतीच्या ईएमआयशिवाय बँक ऑफरसह खरेदी करता येऊ शकतात. आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे की OnePlus 8T आणि OnePlus 8 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत खूप कमी केल्या गेल्या आहेत.
या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन 12 मिनी च्या कमी किंमतीचा फायदा होईल. हा फोन 61 हजार 100 रुपयांमध्ये बँक ऑफरसह उपलब्ध आहे.
व्हिवोच्या स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांपर्यंतच्या बँक ऑफरसह 30% पर्यंत सूट मिळत आहे. येथे ग्राहकांना एक्सचेंजवर 2 हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.
१२ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआईसोबत स्मार्टफोनमध्ये ओप्पो 35% पर्यंत सूट मिळू शकेल. ग्राहक अनुक्रमे 69 आणि 199 रुपयांमध्ये मोबाईल अॅक्सेसरीज आणि हेडसेट मिळवू शकतात. पॉवरबँक 399 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध असेल.