vinayak mete

मंत्रिमंडळात डावलल्याने विनायक मेटेंची तीव्र नाराजी

मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांना संधी देण्यात आली, मात्र शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना वगळण्यात आले. भाजपकडून डावलले गेल्यानं मेटे प्रचंड नाराज आहेत.

Jul 8, 2016, 09:21 PM IST

शिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपूजन एप्रिलच्या अखेरीस : विनायक मेटे

अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.

Feb 18, 2016, 06:38 PM IST

महायुतीच्या घटक पक्षांची संघर्षाची भूमिका

सत्तेत वाटा मिळत नसलेल्या भाजपाबरोबरच्या महायुतीतील पक्षांनी आता उघडपणे भाजपाविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. वारंवार भाजपाकडून केवळ पोकळ आश्वासन मिळत असल्याने या घटकपक्षांनी यापूर्वी अनेक वेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता भाजपाला धडा शिकवण्यासाठी हे पक्ष भाजपाविरोधात संघर्ष करायला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. दुसरीकडे शिवसेनेचीही भाजपाविरोधातील नाराजी वाढत चालली आहे.

Oct 5, 2015, 04:18 PM IST

भाजपच्या गळ्यातील आम्ही लोढणे आहोत का? : रामदास आठवले

भाजपचे घटकपक्ष नाराज असल्याचे दिसून आले आहे. आम्ही भाजपच्या गळ्यातील लोढणे आहोत का? विकास कामे होत नाहीत, याबाबत  मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. भाजपने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. तो त्यांनी दिलेला शब्द पाळावा, सत्तेत १० टक्के वाटा दिला पाहिजे, अशी थेट मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. तर  भाजपने आम्हाला चांगली वागणून दिलेली नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

May 9, 2015, 01:47 PM IST

हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे

मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय. 

Nov 14, 2014, 12:38 PM IST

भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.

Oct 20, 2014, 04:26 PM IST

आम्हाला असमाधानी करून कसं चालेल - मेटे

आम्हाला असमाधानी करून कसं चालेल - मेटे 

Sep 23, 2014, 05:44 PM IST