युपीएची मेजवानी, प्रति थाळी रुपये ८ हजार!
`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर 29 लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर 8 हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2012, 01:10 PM ISTमुख्यमंत्री चव्हाण दिल्ली, केंद्रात १५ नवे चेहरे?
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी काही वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतली. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
Sep 24, 2012, 07:23 PM ISTयूपीएच्या कार्यकाळावर पवारांचा विश्वास
केंद्रात वेगानं सुरू असलेल्या राजकीय घडामोडींकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय. मात्र अशा वेळी महाराष्ट्राला नेहमीच वेध लागतात ते पवारांच्या भूमिकेचे. युपीए सरकारमधल्या घडामोडींवर अखेर पवारांनीही आपली भूंमिका स्पष्ट केलीय.
Sep 19, 2012, 07:34 PM ISTममतांना कल्पना दिली होती - पंतप्रधान
तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममताना आर्थिक सुधारणांचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी कल्पना दिली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.
Sep 19, 2012, 12:32 PM ISTयुपीएला धोका नाही- नीतिश कुमार
केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Sep 17, 2012, 04:12 PM IST`एनडीए`ची भारत बंदची घोषणा...
डिझेलची दरवाढ आणि ‘एफडीआय’च्याविरोधात एनडीएनं २० सप्टेंबरला भारत बंद पुकारलाय. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी याविषयीची घोषणा केली. तसचं पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Sep 15, 2012, 07:38 PM IST`एम फॅक्टर`मुळे सरकार अडचणीत...
यूपीए सरकारसमोर चार ‘एम’ संकट म्हणून उभे ठाकलेत. मायावती, ममता, मुलायम आणि एम. करूणानिधींनी डिझेलची दरवाढ आणि एफडीआयला विरोध केलाय.
Sep 15, 2012, 06:54 PM IST`मौन`मोहन सिंगच भ्रष्टाचारी- वॉशिंग्टन पोस्ट
‘हजारों जवाबों से बेहतर है मेरी खामोशी’ म्हणणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खामोशीवर प्रख्यात अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही टीकेची झोड उठवली आहे. मनमोहन सिंगच भारतातील भ्रष्ट सरकारचे प्रमुख आहेत, असा सनसनाटी आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.
Sep 5, 2012, 01:30 PM ISTकोळसा घोटाळ्यात सरकारकडून दिशाभूल- जेटली
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी भाजपनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कोळसा वाटपात शुन्य तोटा झाल्याचा सरकारनं केलेला दावा हास्यास्पद असल्याचं भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी सरकारनं कोळसा खाणींचं वाटप केलं त्या दिवशीच सरकार तोट्यात गेलं असा दावा जेटलींनी केलाय.
Aug 25, 2012, 05:09 PM ISTयुपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब
युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.
Aug 11, 2012, 05:38 PM ISTसरकारवर नाराज शरद पवार, दिला राजीनामा
पंतप्रधान ड़ॉ. मनमोहन सिंग केंद्र मंत्रिमंडळात ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अपसेट झालेत. त्यांनी आपल्या नाजीतून पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी, अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही राजीनामा दिल्याने केंद्रातील सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीने पंतप्रधानांना दणका दिल्याचे दिसून येत आहे.
Jul 20, 2012, 09:52 AM ISTएनडीएने दिली जसवंत सिंग यांना उमेदवारी
एनडीएने देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नेते जसवंत सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ही घोषणा केली आहे.
Jul 16, 2012, 12:39 PM IST...आणि शरद पवार नाराज झाले?
युपीएच्या कालच्या बैठकीला शरद पवार अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादी यूपीएवर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगतीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठताक्रमात पवार यांना डावलून संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांना दुस-या क्रमांकाचं स्थान दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे.
Jul 15, 2012, 02:27 PM ISTयुपीएकडून अन्सारी तर बिजेपीकडून हेप्तुल्ला !
उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएनं हमीद अन्सारींच नाव जाहीर केल्यावर भाजपनंही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
Jul 15, 2012, 07:11 AM ISTउपराष्ट्रपती हमीद अन्सारीच?
विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या गळ्यात पुन्हा उपराष्ट्रपती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने हमीद अन्सारी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Jul 9, 2012, 04:47 PM IST