up

रेल्वे दुर्घटनांवर बोलला भज्जी आणि....

उत्तर प्रदेशात एका आठवड्यात दोन रेल्वे अपघात झालेत. कानपुर आणि इटावाच्यामध्ये औरेया जिल्ह्यात बुधवारी अपघात झाला. आजमगड ते दिल्ली जाणारी १२२२५ (अप)  या कैफियत एक्सप्रेसची डंपरला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली. 

Aug 23, 2017, 04:56 PM IST

वाराणसीच्या रस्त्यांवर नरेंद्र मोदी बेपत्ता

उत्तरप्रदेशच्या वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले पोस्टर लागलेले दिसत आहेत. 

Aug 19, 2017, 09:36 AM IST

उत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.

Aug 17, 2017, 06:17 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणाऱ्या मदरशांवर योगी सरकार करणार कारवाई

उत्तर प्रदेशमध्ये ज्या मदरशांमध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नाही गायलं गेलं त्या मदरशांविरोधात योगी सरकार कडक कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.

Aug 17, 2017, 05:15 PM IST

व्हिडिओ : जेव्हा शाळेत बारबालांवर उडवले जातात पैसे...

शिक्षेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेतच बार गर्ल्स थिरकताना दिसल्या तर... 

Aug 10, 2017, 04:45 PM IST

धक्कादायक! बलात्कार पीडित तरुणीवर दुसऱ्यांदा अॅसिड हल्ला

 उत्तर प्रदेशमध्ये गुंडांची मुजोरी वाढतच चालल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. लखनऊमध्ये काही गुंडांनी एका तरुणीवर दुस-यांदा अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही तरुणी रायबरेलीची रहिवाशी असून लखनऊच्या अलीगंज भागातील हॉस्टेलमध्ये राहते.

Jul 2, 2017, 12:53 PM IST

मुख्यमंत्री योगींना घेतली पंतप्रधान मोदींची भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

Jun 12, 2017, 12:41 PM IST

कोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद

एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.  

Jun 1, 2017, 06:31 PM IST

यूपीत अल्पसंख्यांकांचं आरक्षण रद्द होणार?

यूपीत अल्पसंख्यांकांचं आरक्षण रद्द होणार?

May 23, 2017, 12:40 AM IST

यूपीत आणखी ५ पेट्रोलपंपावर छापे, २ जणांना अटक

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं होतं. STF च्या टीमने आज आणखी ५ पेट्रोलपंपवर धाड टाकत पेट्रोलपंपावरील मशीनी तपासल्या. लखनऊमध्ये गुरुवारी रात्री देखील ७ पेट्रोल पंपांवर छापे मारण्यात आले होते. त्यामध्ये  पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत असल्याचं समोर आलं होतं.

May 1, 2017, 07:19 PM IST

पेट्रोल पंपावरील मोठा भ्रष्टाचार उघड, लोकांना लाखोंचा चुना

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते. 

Apr 28, 2017, 06:27 PM IST

साधुच्या वेशात यूपीमध्ये घुसले दहशतवादी, मुख्यमंत्री योगी निशान्यावर

योगी आदित्यनाथ यांचं कार्यालय दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. साधु संतांच्या वेशात दहशतवादी हल्ला करु शकतात. यूपीमधील अनेक इमारती, मुख्यमंत्री कार्यालय, विमानतळ आणि ऐतिहासिक जागा दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे.

Apr 22, 2017, 03:59 PM IST

महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या सुट्या योगींनी केल्या रद्द

आज उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळा कॉलेजना देण्यात येणाऱ्या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे.

Apr 14, 2017, 02:57 PM IST

'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!

मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत. 

Apr 7, 2017, 07:54 PM IST