'पंतप्रधानांबद्दल आदर, पण चौकशी व्हायलाच हवी'
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्यानंतर टीम अण्णानं या आरोपांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही तर, हे आरोप खोटे ठरले तर आपल्याला खूप आनंद होईल, असंही टीम अण्णानं म्हटलंय.
May 30, 2012, 06:48 PM ISTटीम अण्णा पुन्हा आक्रमक, पंतप्रधानांवरही आरोप
टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
May 26, 2012, 03:15 PM IST'फेसबूक'वरून 'टीम अण्णा'मध्ये वितुष्ट
भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणा-या टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याचं समोर आलंय. टीम अण्णा सदस्य शिवेंद्र सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केलाय.
May 25, 2012, 02:16 PM ISTटीम अण्णा भ्रष्ट, बाळासाहेबांनी केलं स्पष्ट
टीम अण्णावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानेच अण्णा हजारे यांना भेट नाकारल्याचं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. मी अण्णा नाही, असं म्हणत त्यांनी अण्णांच्या आवाजाची नक्कलही केली.
Apr 29, 2012, 03:52 PM ISTआमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे
मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती बाहेर जात असल्याच्या कारणावरून किंवा रामदेव बाबांवरून टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अण्णा म्हणालेत.
Apr 23, 2012, 02:18 PM IST'टीम अण्णा'मधून मुफ्ती काझमी बाहेर
नॉएडात टीम अण्णांची बैठक सुरु असतानाच त्यात फूट पडली. आंदोलनात सुरुवातीपासून असलेले मुफ्ती शगूम काझमी बाहेर पडले आहेत. टीम अण्णांचे काही सदस्य काही मुद्द्यांचे राजकारण करत असल्याचा आरोप काझमी यांनी केलाय.
Apr 22, 2012, 06:50 PM ISTटीम अण्णांचं आता 'द अण्णा एसएमएस कार्ड'
भ्रष्टाचार विरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेबद्दल जनसामान्यांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी टीम अण्णांनी अखिल भारतीय एसएमएस कार्ड सुरू केलं आहे. टीमने या पहिल्या चरणात २५ रुपये किमतीची १ कोटी कार्ड्स उपलब्ध केली आहेत.
Apr 7, 2012, 11:28 AM ISTअण्णांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
देशाला राजकारण्यांनी लुटलं आहे. आता देशाच्या मालकांना जागा आली आहे. जनतेने जागरुक राहिले पाहिजे. आता दिल्ली निवडणुकीसाठी तयारी करणार. कर्जाचे व्याज देण्यासाठी देशाला परत कर्ज घ्यावे लागत आहे. देशात लोकशाही आणण्यासाठी ही लढाई आहे.
Mar 28, 2012, 03:20 PM ISTशरद यादवांच्या संदर्भात केजरीवालांचे वादग्रस्त विधान
टीम अण्णांच्या अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन वादंगाला तोंड फोडलं आहे. शरद यादव यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद भडकण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2012, 04:19 PM ISTलोकपाल : अण्णांचे पुन्हा जंतरमंतर
सक्षम लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागेल. ते सकरारचे कर्तव्य आहे, असे टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या. दरम्यान लोकपालबाबत सरकारची उदासिनदा दिसून येत आहे. त्यामुळे मला पुन्हा दिल्लीत जंतर मंतरवर उपोषण करावे लागेल, अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
Mar 23, 2012, 04:44 PM ISTटीम अण्णांचे केजरीवाल अडचणीत
देशाच्या संसदेत खूनी, दरोडेखोर आणि बलात्कारी बसले आहेत, असे वक्तव्य करणारे टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
Mar 17, 2012, 06:54 PM ISTसंसद सदस्य दरोडेखोर आहेत- अरविंद केजरीवाल
टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी संसद सदस्य चोर, दरोडेखोर आणि बलात्कारी असल्याचं विधान केल्यानंतर मोठ्या वादंगाला तोंड फूटलं आहे. देशातल्या जकीय नेत्यांनी केजरीवाल यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
Feb 27, 2012, 12:29 AM ISTटीम अण्णा घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट
टीम अण्णा आज मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरैशी यीं भेट घेणार आहेत. प्रस्तावित निवडणूक सुधारणा प्रक्रियेत नागरी समाज (सिव्हिल सोसायटी) यांचा समावेश करण्यासंबधींच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी टीम अण्णा मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेणार आहे.
Feb 23, 2012, 11:58 AM ISTटीम अण्णांवर 'बूटफेक'
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि टीमवर बूट भिरकावण्याची घटना उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये घडली आहे. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी एका कार्यक्रमासाठी डेहराडूनमध्ये आले असताना त्यांच्यावर एका माथेफिरूनं बूट भिरकावला.
Jan 21, 2012, 08:44 PM ISTटीम अण्णांचे प्रचार अभियान सुरू
टीम अण्णा पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अभियानात उतरली आहे. आजपासून प्रचार अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा काय प्रभाव दिसून येतो याकडे लक्ष लागले आहे.
Jan 21, 2012, 01:08 PM IST