shri auto center

महाडमध्ये श्रीऑटो सेंटरला भीषण आग

महाड एमायडीसी येथील मुंबई गोवा महामार्गावरील श्री ऑटो या मारूती सर्व्हीस सेंटरला सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशामन दलाला यश आलेले नाही. महाड नांगलवाडी फाट्याजवळील ही घटना घडली. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर ज्वाळा आणि धुरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

Mar 3, 2015, 09:41 PM IST