prime minister

पंतप्रधान मोदी म्यानमार दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारची राजधानी नायपिदाँ इथं दाखल झाले आहेत.

Sep 6, 2017, 12:26 PM IST

तैवानच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा

तैवानचे पंतप्रधान लिन चुआन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. चुआन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रपती सई इंग-वेन यांच्याकडे राजीनामा दिल्याची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रपती सई इंग-वेन यांनी हा राजीनामा स्विकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Sep 5, 2017, 02:16 PM IST

मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही : राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  गेल्या तीन वर्षात मोदी सरकारनं आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा राहुल गांधींनी आरोप केला. 

Aug 17, 2017, 10:01 PM IST

चीनसोबत तणाव असतांना पंतप्रधान मोदी करणार म्यानमारचा दौरा

चीनसोबत वाढत असलेला तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात म्यांमारचा दौरा करणार आहेत. ६ आणि ७ सप्टेंबरला मोदी म्यांमार दौरा करणार आहेत. मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.

Aug 17, 2017, 11:43 AM IST

दोनदा पंतप्रधान झाले पण एकदाही लाल किल्ल्यावर झेंडा नाही फडकावला

 पंतप्रधान होण्याचे स्वप्न बहुतांश नेते मंडळी बघत असतात. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवावा आणि देशवासियांना संबोधित करावे अशी महत्त्वकांक्षा अनेक नेत्यांची असते. पण असेही एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना त्यांच्या कार्यकाळात झेंडा फडकविण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे असे दोन पंतप्रधान आपल्या देशात झाले ज्यांना हा क्षण अनुभवता आला नाही. त्यातील एक तर दोनदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले होते.

Aug 15, 2017, 07:20 PM IST

मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 

Aug 1, 2017, 08:38 AM IST

कारगिल दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी काढली शहिदांची आठवण

कारगिल दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहिदांची आठवण काढली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं की, सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबत देशवासियांनी देखील युद्धात पूर्ण सहयोग दिला होता.

Jul 26, 2017, 10:27 AM IST

पंतप्रधान मोदींनी इस्राईलमध्ये केल्या ३ मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इस्राइलमधील भारतीयांना संबोधित करताना प्रगतीच्या दिशेने झेपावणाऱ्या युवा भारताचे चित्र सादर केले. भारत आणि इस्त्रायल  मिऴून जग बदलू शकतात हा विश्वास मोदींनी आपल्या भाषणात दिला.

Jul 6, 2017, 09:27 AM IST

पंतप्रधान मोदी करणार बड्या कंपन्यांच्या सीईओंना संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. इस्त्रायल आणि भारताच्या बड्या कंपन्यांच्या सीईओच्या संयुक्त परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर हैफा शहरात असणाऱ्या पहिल्या महायुद्धात मृत्यू पावलेल्यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून आपला दौरा संपवतील. दुपारनंतर मोदी जर्मनीला रवाना होतील.

Jul 6, 2017, 08:55 AM IST

पंतप्रधान मोदींना इस्राईल दौऱ्यात मिळणार सरप्राईज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्राईल दौरा आजपासून सुरु होत आहे. इस्राईल दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ऐतिहासिक दौरा ठरणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू प्रोटोकॉल तोडून विमानतळावर पोहोचणार आहेत. इस्राईलच्या दौ-यात पंतप्रधान मोदींना सरप्राइज मिळणार आहेत.

Jul 4, 2017, 11:28 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.

Jul 4, 2017, 09:12 AM IST

पंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन

पंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन

Jun 16, 2017, 02:28 PM IST

पंतप्रधानांच्या 'एसपीजी' टीममध्ये महिला कमांडोचा समावेश

नरेंद्र मोदी सोमवारी चार देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. हा त्यांचा नेहमीसारखाच दौरा... पण या दौऱ्याच्या निमित्तानं एक चांगली सुरुवात झालीय.

Jun 1, 2017, 01:30 PM IST