दाभोलकरांची हत्या सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट - राणे
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे. ही संपूर्ण सरकाराची जबाबदारी आहे, असा घरचा आहेर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलाय.
Aug 21, 2013, 10:01 AM ISTदाभोलकरांवर ‘संगम माहुली’त अंत्यसंस्कार
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या मूळगावी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी मुक्ता हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
Aug 21, 2013, 09:00 AM ISTगांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्तींनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, हा प्रश्न होतं आहे.
Aug 20, 2013, 08:15 PM IST...नाहीतर खूनाचे बोट सरकारकडे जाते – राज ठाकरे
अख्या देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आणि तेही पुण्यासारख्या शहरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होतो. हे दुर्दैव आहे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली आहे. या खूनाचा तपास झालाच पाहिजे. ..नाहीत खूनाचे बोट सरकारकडे जाते, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Aug 20, 2013, 04:50 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या फोटोंवरील ‘क्रॉस’चं गूढ काय?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही ही हत्या म्हणजे पूर्वनियोजिक कट असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमिवर आता दाभोलकरांच्या फोटोंवर असलेलं ‘क्रॉस’चं चिन्हं काय सांगतं, हा प्रश्न निर्माण झालाय?
Aug 20, 2013, 01:24 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार
साताऱ्यामध्ये महाराष्ट्र अनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराच्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते-कार्यकर्ते यावेळी हजर राहणार आहेत. मात्र त्याआधी साधनाच्या कार्यालयात दाभोलकरांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Aug 20, 2013, 12:05 PM ISTदाभोलकरांची हत्या ही सरकारला कमीपणा आणणारी - पवार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या ही महाराष्ट्र सरकारला आणि गृहमंत्र्यालयाला कमीपणा आणणारी बाब आहे, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
Aug 20, 2013, 10:55 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर यांना द्या श्रद्धांजली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि `साधना` साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली.
Aug 20, 2013, 09:55 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Aug 20, 2013, 09:08 AM IST