युपीएच्या मानगुटीवर युपीचं भूत..
भलतचं धाडस राहुलबाबांच्या अंगाशी आलं आणि युपीत काँग्रेसला तोंडघशी पडावं लागलं. गरिबांचा कळवळा असल्याचं दाखवणा-या राहुलबाबांना युपीतल्या जनतेनं नाकारलं उलटं टॅब्लेटची स्वप्न दाखवणा-या आणि शेतक-यांना सोबत घेणारा अखिलेश त्यांना जवळचा वाटला. पण अपयशाची जबाबदारी स्विकारणा-या राहुल बाबांचा उदोउदो करणा-यांना वेळीच लगाम घालून चुकांमधून शिकणं काँग्रेससाठी अत्यावश्यक आहे नाहीतर मग युपी पॅटर्नची पुनरावृत्ती होणार आहे.
Mar 7, 2012, 10:31 PM ISTका अटली मतदारांची 'माया'?
‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.
Mar 7, 2012, 10:59 AM ISTहत्तींवर पडदा, दलित विरोधी!
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी निवडणूक आयोगाच्या पुतळे झाकण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची कारवाई सरकारच्या दबावाखाली असून हा आदेश म्हणजे दलित विरोधी मोहीम असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.
Jan 16, 2012, 09:18 AM ISTमायावतींचा केंद्रावर हल्लाबोल
उत्तर प्रदेशाच्या विभाजनाच्या मुद्यावर मुख्यमंत्री मायावतींना केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्रानं राज्याला कळवण्यापूर्वीच मिडीयात रिपोर्ट लीक केल्याचा आरोप मायावतींनी केलाय़. तसंच केंद्रानं उपस्थित केलेले सवाल म्हणजे घटनेचे उल्लंघन असल्याचा आरोपही मायावतींनी केला आहे.
Dec 21, 2011, 04:28 AM IST'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Dec 13, 2011, 09:21 AM ISTउत्तर प्रदेश विभाजनाचा प्रस्ताव मंजूर
उत्तर प्रदेशचं चार राज्यात विभाजन करण्याचा मायावतींचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव मंजूर होत असतानाच विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मात्र, तरीही प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव पुढे केंद्राकडे पाठवण्यात येईल.
Nov 21, 2011, 08:20 AM ISTऊस शेतकऱ्यांवर 'माये'ची पाखर
महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने उसाला योग्य दर मिळावा यासाठी तीव्र आंदोलन छेडलं असताना तिकडे उत्तर प्रदेशात मायावती सरकारने उसाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ केली आहे.
Nov 9, 2011, 11:55 AM ISTमायावतीचं काँग्रेसवर शरसंधान
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका समीप येऊ लागल्याने राज्यातलं वातावरण आता तापू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला आहे. काँग्रेसची नजर दलित मतांवर आहे आणि त्यासाठी ते सुशीलकुमार शिंदेंना पंतप्रधान बनवतील असं विधान मायावतींनी केलं आहे.
Oct 14, 2011, 02:07 PM IST