सोनोग्राफी सेंटर्सनं पुकारला बेमुदत बंद
औरंगाबादेत प्रशासनाच्या कारवाईच्या निषेधार्थ सोनोग्राफी सेंटर्सने बेमुदत बंद पुकारलाय.
Jul 10, 2012, 03:19 PM ISTस्त्री भ्रूण हत्या: दोषींवर 'दफा ३०२'
स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींनी विधानसभेत ही माहिती दिलीय.
Jul 10, 2012, 02:29 PM ISTमहाराष्ट्र पुढे...पण स्त्रीभ्रूण हत्येत
राज्यात स्त्रीभ्रूण हत्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मात्र आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भ्रूणहत्या आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. तर महानगरांमध्ये मुंबई तिस-या क्रमांकावर आहे.
Jul 8, 2012, 10:36 AM ISTस्त्री भ्रूण हत्या : आणखी एका डॉक्टरला अटक
औरंगाबादच्या वाळूज रांजनगाव परिसरातील पूजा नर्सिंग होमच्या डॉक्टरांविरोधात स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी डॉक्टर महेंद्र जैन यांना अटक करण्यात आलीय. तर तीन डॉक्टर फरार आहेत.
Jun 29, 2012, 12:16 PM ISTफरार डॉ. मुंडेचे पाच राज्यांत वास्तव्य
परळीतील बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणी फरार झालेला डॉ. सुदाम मुंडे अखेर पोलिसांना शरण आलाय. मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी परळीतल्या पोलीस स्टेशनसमोर हजेरी लावली. पोलिसांना चकवा देत मुंडे पती-पत्नीने २६ दिवसांत तब्बल पाच राज्य पालथी घातली.
Jun 18, 2012, 09:53 AM ISTडॉ. सुदाम मुंडेची 'सपत्नीक' शरणागती
परळीतल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकऱणी डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे रात्री 9 वाजता परळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. उद्या सकाळी त्यांना परळी न्यायालयात हजर करणार आहेत. मुंडे काल संध्याकाळपर्यंत परळीमध्येच होता.
Jun 17, 2012, 11:37 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही गर्भपात प्रकरण उघडकीस
संपूर्ण राज्यात सध्या स्त्री-भ्रूण हत्याप्रकरण गाजत असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आलाय. बोगस डॉक्टरनं गर्भलिंग निदान करून बेकायदीशीररित्या महिलेचा गर्भापात करून गर्भ शेतात पुरल्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
Jun 11, 2012, 08:46 AM ISTमुंबईतही भ्रूण हत्या ?
मुंबईच्या कुर्ला भागात महापालिका शाळेजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ४ महिन्यांचं मृत भ्रूण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. एका पिशवीत बांधून मृत भ्रूण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आलं होतं.,
Jun 8, 2012, 11:49 AM ISTबीडमध्ये गर्भपिशवी काढण्याचा धंदा
डॉक्टर सुदाम मुंडे, डॉक्टर शिवाजी सानप यांच्यावरील कारवाईनंतर बीडमधल्या स्त्रीभ्रूणहत्यांचा मुद्दा पुन्हा गाजतोय. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासांत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्यात आहेत. परळी, बीडमध्ये केवळ गर्भपात, स्त्री भ्रूणहत्याच होत नाहीत, तर गर्भपिशवी काढून टाकण्याचा धंदाही इथं जोरात असल्याचं तपासात पुढे आले आहे
Jun 4, 2012, 07:48 PM ISTप्रिया सानप यांच्या विरोधातही गुन्हा
बीडमध्ये स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी काल अटक झालेल्या डॉक्टर शिवाजी सानप यांच्या पत्नी प्रिया सानप यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jun 4, 2012, 07:15 PM ISTफरार डॉ. मुंडेकडे कोट्यवधींची माया
स्त्री भ्रूण हत्येतील प्रमुख आरोपी डॉ. सुदाम मुंडे याच्याकडे कोट्यवधी रूपयांची माया सापडली आहे. तो १५० कोटी संपतीची धनी असल्याचे उघड झाले आहे. मुंडे हा अनेक दिवसांपासून फरार असल्याने त्याची माहिती देणाऱ्यासाठी ४० हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे.
Jun 4, 2012, 06:56 PM ISTबीडमध्ये मेडिकल दुकानावर छापे
बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.
Jun 4, 2012, 05:34 PM ISTखासगी सोनोग्राफी सेंटर्स होणार बंद
बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. यानुसार बीड जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे.
Jun 4, 2012, 05:34 PM ISTस्त्री भ्रूण हत्या प्रकरण; बीडमध्ये कारवाईचा धडाका
बीडमधल्या बार्शी नाका परिसरातल्या पुलाखालच्या नदी पात्रात दोन आणि काकाधीरा इथं एक अर्भकं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी क्रौर्याची किती परिसीमा गाठली हे पुन्हा एकदा उघड झालं. झी 24 तासनं शनिवारी दुपारी सर्वात आधी हा प्रकार उघड केला. त्याची मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत कारवाईचे आदेश दिले. यानंतर लगेचच सानप हॉस्पिटलच्या डॉ. शिवाजी सानपसह तिघांना अटक करण्यात आलीए.
Jun 3, 2012, 09:20 AM ISTमहाराष्ट्रातच सावित्रीच्या लेकी असुरक्षितच
महाराष्ट्रातच सावित्रीच्या लेकी असुरक्षित आहेत. बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्येचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बीडमध्ये मान्यता रद्द झालेलं भगवान हॉस्पिटल सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय.
Jun 2, 2012, 09:38 PM IST