farmer

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस

Maharashtra Weather :  मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.

Mar 18, 2023, 07:23 AM IST

Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Weather Updates : राज्यात 15 ते 17  मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.  (Maharashtra Weather News)

Mar 14, 2023, 10:33 AM IST

'झी 24 तास' चा दणका । खतासाठी जात : विधानसभेत दखल, जातीचा रकाना काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Caste for Fertilizer :  खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार 'झी 24 तास'ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.

Mar 10, 2023, 01:12 PM IST

Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Mar 10, 2023, 08:45 AM IST

शेतकऱ्याची थट्टा! एक किलो वांग्याला 27 पैशांचा दर..

Maharashtra News: अवकाळी पावसामुळे शतेकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 27 प्रति किलो असा दर वांग्याला मिळाला आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्याची चेष्टा आहे. 

Mar 8, 2023, 08:08 PM IST

पावसाच्या तडाख्यात घर जमीनदोस्त, रात्रीच मुला-बाळांसह कुटुंबाचे तहसील कार्यालयात ठाण

Rain in Dharashiv : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही कुटुंबाना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Rain )  नाशिक विभागात 6 हजार हेक्टरवर पिकांना फटका आहे. संभाजीनगरात गहू पीक आडवं तर शिरुरमध्ये मक्याचं मोठं नुकसान झाले आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे.  तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही  सध्या पावसाची शक्यता आहे.

Mar 7, 2023, 03:49 PM IST

Maharashtra Rain : अवकाळी पावसाने झोडपले, पिक भुईसपाट तर बळीराजा पुरता आर्थिक संकटात

Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बसल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी फळाबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले आहे.नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारींवर टाकण्यात आली होती. तीही अवकाळी पावसात भिजल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

Mar 7, 2023, 03:07 PM IST

बळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला

कांद्याला (Onion) योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिकमधील (Nashik) शेतकऱ्याने तब्बल दीड एकरातील कांद्याला आग लावून पेटवून दिला आहे. कृष्णा डोंगरे यांनी 'कांदा अग्निडाग' कार्यक्रमाची पत्रिका तयार केली होती. पण यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. 

 

Mar 6, 2023, 04:57 PM IST