election 2017

मुंबई महापालिका निवडणूक, २१६ उमेदवारांवर गुन्हे दाखल

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी रणांगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असल्याचे समोर आलंय. 

Feb 17, 2017, 12:48 PM IST

मराठवाड्यात मोठ्या उत्साहात मतदान

जिल्हापरिषदेसाठी आज मराठवाड्यातही मोठ्या उत्साहात मतदान झालं. काँग्रेस राष्ट्रवादीची पारंपारिक बालेकिल्ले ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपची जोरदार लढाई रंगल्याचे चित्र संपूर्ण मराठवाड्यात दिसले. 

Feb 16, 2017, 06:59 PM IST

'शिवसेना अजिबात सत्तेतून बाहेर पडणार नाही'

शिवसेना अजिबात सत्तेतून बाहेर पडणार नाही

Feb 16, 2017, 05:50 PM IST

निवडणुकीनंतर मित्रपक्षांची नाराजी दूर करु - दानवे

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केला इन्कार

Feb 16, 2017, 05:43 PM IST

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला चांगला प्रतिसाद

उत्तर प्रदेशमध्ये दुस-या टप्प्यात 67 जागांसाठी आणि उत्तराखंडमधल्या 70 पैकी 69 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशात 65 टक्के तर उत्तराखंडमध्येही तब्बल 68 टक्के मतदान झालं.

Feb 15, 2017, 10:24 PM IST

अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात थोरात-विखे वाद

जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्‍यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

Feb 15, 2017, 05:39 PM IST

पुण्यातील कसबा - सोमवार पेठेत चुरशीची लढत

महापालिका निवडणुकीत काही चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातील सर्वाधिक चुरशीची लढत म्हणून कसबा - सोमवार पेठेतील लढतीकडं बघितलं जातंय. याठिकाणी भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध - काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना रंगणार आहे.

Feb 15, 2017, 04:23 PM IST

अपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका

उत्तर प्रदेशमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. ११ जिल्ह्यांमध्ये ६७ जागांसाठी आज उमेदवार आपलं नशीब आजमातायंत. तर सूबेमध्ये १९ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. लखनऊमधील कैंट विधानसभा सीटवर चुरशीची लढाई आहे. मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांची टक्कर भाजप उमेदवार रिता बहुगुणा आणि बीएसपी उमेदवारासोबत होणार आहे.

Feb 15, 2017, 04:11 PM IST

...म्हणून टाटांनी माझी पाठ थोपटली - राज ठाकरे

राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या बोटॅनिकल गार्डनचा विशेष उल्लेख केला.

Feb 14, 2017, 08:37 PM IST

राजकीय व्हॅलेंटाईन: ४ जोड्या निवडणुकीच्या मैदानात

राजकारणात घराणेशाही नवीन नाही. पण एकाचवेळी नवरा-बायको दोघंही निवडणुकीच्या रिंगणात असतील तर त्याचं वेगळंच कुतूहल असतं. पुण्यात अशा एक-दोन नाही, चक्क 4 जोड्या निवडणूक लढवत आहेत. गंमत म्हणजे हे सगळेच्या सगळे डबे आहेत ते मनसेच्या इंजिनाचे.

Feb 14, 2017, 05:59 PM IST

घाटकोपरमध्ये भाजप उमेदवाराने साड्या वाटल्याचा आरोप

भाजपच्या घाटकोपरमधल्या नगरसेविका आणि वॉर्ड १२७ च्या भाजप उमेदवार रितु तावडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेनं तक्रार केली आहे. आचारसंहिता भंग केल्याची शिवसेनेनं तक्रार केली आहे.

Feb 14, 2017, 04:28 PM IST

युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी मतदान

एकाच टप्प्यात 69 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या 68 जागांसाठी बुधवारी मतदान होतं आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराच्या या टप्प्यात भाजपानं अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा ताफा प्रचारात उतरवला.

Feb 13, 2017, 10:48 PM IST