नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये दुस-या टप्प्यात 67 जागांसाठी आणि उत्तराखंडमधल्या 70 पैकी 69 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशात 65 टक्के तर उत्तराखंडमध्येही तब्बल 68 टक्के मतदान झालं.
दोन्ही राज्यांमध्ये 2012पेक्षा यंदाची मतदानाची टक्केवारी जास्त आहे. वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. पश्चिम उत्तर प्रदेशात रोहेलखंड सहारनपुर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, अमरोहा, रामपुर, बदायूं, बरेली, पीलीभीत, शाहजहांपुर आणि लखीमपुर खीरी या 11 जिल्ह्यांचा कौल मतदानयंत्रात बंद झालाय. या टप्प्यात ७२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. उत्तराखंडमध्ये एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे कर्णप्रयागला 9 मार्चला मतदान होईल.