बिबट्याची मान चक्क हंड्यात अडकली
राजस्थानमध्ये भांड्यातील पाणी पिण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला खरा. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्याचे तोंड त्या भांड्यात अडकले. भांडे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबट्याची मानच भांड्यात अडकली. त्याच अवस्थेत तो बिबट्या जंगलात जाण्याचा प्रयत्न केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. याचा व्हिडिओ एएनआयने ट्विटवर अपलोड केलाय.
Sep 30, 2015, 04:07 PM ISTजाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये...
आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक असते. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे हे विषासारखे असते. लगेच पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचन क्रियेवर पडतो.
Jan 7, 2015, 08:14 PM ISTडेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा
राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Nov 7, 2014, 07:48 AM IST