breaking news

Sridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?

Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे. 

Aug 13, 2023, 09:00 AM IST

Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.

Aug 13, 2023, 07:08 AM IST

राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे

Aug 13, 2023, 06:24 AM IST

परदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन

सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला. 

Aug 12, 2023, 05:09 PM IST

दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

Nagpur Death: दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे. 

Aug 12, 2023, 04:37 PM IST

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

Success Story: केवल हा संगमनगरच्या संजय गांधी नगरच्या झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडे बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे. 

Aug 12, 2023, 01:27 PM IST

शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर, मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर

Mumbai Trans Harbour Link: 4.512-किमी-लांब  असलेला शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील  मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी इंटरचेंजपासून सुरू होतो. 

Aug 12, 2023, 11:10 AM IST

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, 'स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत...'

Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता ट्विटरवरून टीका केलीय. चांदणी चौकातील पुलासाठी आपण स्वत: फॉलोअप घेतला. मात्र आता त्याचं श्रेय कोथरूडचे विद्यमान नेते घेत असल्याचं ट्विट त्यांनी केलंय.

Aug 12, 2023, 09:35 AM IST

शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Hingoli Crime: 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. येथे पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीला शिकत होती. तेथे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईच्या मुलाने हे दुष्कृत्य केले. त्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Aug 11, 2023, 05:56 PM IST

स्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स

Independence Day Offer: अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे. 

Aug 11, 2023, 05:13 PM IST

लष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण 'त्यांना' आग पेटती ठेवायचीय -राहुल गांधी

Rahul Gandhi Reaction on Mnaipur: फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. पंतप्रधानांना मणिपूरला पेटवायचे आहे. त्यांना देशात काय चाललंय हे माहिती नाही. पंतप्रधानांनी खिल्ली उडवायला नको होती, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

Aug 11, 2023, 03:23 PM IST

आधार कार्ड वापरुन 5 मिनिटांत 2 लाखांपर्यंत मिळवा कर्ज

आधार कार्डचा उपयोग वैयक्तिक कर्जासाठी देखील करता येतो. यामाध्यमातून तुम्ही 5 मिनिटात 2 लाखांचे कर्ज मिळवू शकता. तुमचे आधार कार्ड वापरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर करून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा.यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो त्यात भरा. आता पर्सनल लोन पर्याय निवडा.

Aug 11, 2023, 03:07 PM IST

तुमच्या गावासाठी ग्रामपंचायतीने किती खर्च केला? जाणून घ्या एका क्लिकवर

आपल्या गावचा विकास व्हावा हे प्रत्येकाला वाटते. पण आपली ग्रामपंचायत गावासाठी काय करते हे अनेकांना माहिती नसते. बऱ्याच वेळा गावचा विकास होत नाही म्हणून आपण ओरडत बसतो.ग्रामपंचायतीत आलेला पैसा जातो कुठे हे समजण्याचा प्रयत्न कधी केला आहे का ? तुमच्या ग्रामपंचायतीने केलेला पूर्ण खर्च आणि पुढील महिन्यांतील खर्चाचे प्लानिंग एका क्लिकमध्ये ऑनलाईन बघू शकता.

Aug 11, 2023, 01:44 PM IST

Pune Crime: लैंगिक अत्याचार त्यावर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून 'तसले' व्हिडीओ व्हायरल

Pune Crime: पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय होता. दरम्यान आपला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून अर्जुनने पीडित तरुणीला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

Aug 11, 2023, 12:45 PM IST

मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी

 Student Sucide:  एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. 

Aug 11, 2023, 11:37 AM IST