bharatiya janata party

'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान

गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत. 

Sep 24, 2014, 10:34 AM IST

जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत

महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

Sep 21, 2014, 03:27 PM IST

पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल - विनोद तावडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नवीन आणि अंतिम प्रस्तावानंतर भारतीय जनता पक्षानं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिलीय. पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल आणि प्रत्यक्ष भेटूनच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. 

Sep 21, 2014, 02:47 PM IST

चर्चेचं गुऱ्हाळ संपेना: भाजपचा नवा फॉर्म्युला शिवसेना मान्य करणार?

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीमधील चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. शिवसेनेनं देऊ केलेला 126 जागांचा प्रस्ताव भाजपानं फेटाळला असून, १३०-१४०-१८ असा नवा फॉर्म्युल्याचा प्रस्ताव आता भाजपनं शिवसेनेला दिलाय.  

Sep 21, 2014, 08:33 AM IST

मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात

लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

Sep 2, 2014, 04:01 PM IST

भाजपनं दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास

'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय. 

Aug 30, 2014, 01:57 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी चार दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना झाले. व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौऱ्यावर गेले आहेत. 

Aug 30, 2014, 12:42 PM IST

आरोपी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये - सुप्रीम कोर्ट

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेल्या नेत्यांना स्थान देऊ नये, असं महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टानं मांडलं आहे.

Aug 27, 2014, 01:53 PM IST