best strike

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक

मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी तीन वाजता मातोश्रीवर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होते आहे.

Aug 7, 2017, 02:09 PM IST

मुंबईत स्कूल बस, कंपनी बसमधूनही प्रवासी वाहतूकीला परवानगी

बेस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईत काही उपाययोजना केल्यात. स्कूल बस, कंपनी बस आणि मालवाहू वाहनांतूनही प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलीये. 

Aug 7, 2017, 08:19 AM IST

बेस्ट संपाबाबतची बैठक निष्फळ, मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर

बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. 10 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं आहे. मात्र लेखी आश्वासनाची मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे.

Aug 6, 2017, 04:26 PM IST

९७ टक्के बेस्ट कर्मचाऱ्यांचं संपाच्या बाजूने मत

बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत असतानाच आता कर्मचा-यांच्या संपाचे सावट घोंगावत आहे. ९७ टक्के बेस्ट कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे. संप करावा की नाही यासाठी सर्व बेस्ट डेपोमध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या वतीनं मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Jul 19, 2017, 04:36 PM IST