सेलिब्रेटी

सेलिब्रेटी उमेदवार: किरण खेर, परेश रावल विजयी

लोकसभा निवडणूक 2014मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशीब निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केलाय. त्यात काहींना यश तर काहींना अपयश पाहावं लागतंय. कोण-कोणते सेलिब्रेटी विजयी झाले आणि कोणते पराभवाच्या छायेत आहे ते पाहूया...

May 16, 2014, 01:05 PM IST

बॉलिवूड आणि सेलिब्रेटींमध्येही मोदी फिवर!

गुजरातमध्ये निवडणूक प्रचार चांगलाच रंगणार असल्याचं दिसतंय. कारण बॉलिवूड तारेतारका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी प्रचार करण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास वीस तारेतारकांनी नरेंद्र मोदींची भेट घेतलीय.

Mar 25, 2014, 11:51 AM IST

सेलिब्रेटी सर्व्हिस टॅक्स भरणारे आणि बुडवणारे

२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.

Feb 5, 2014, 03:49 PM IST

किंग खानने टाकले धोनीला मागे!

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा देशातला सर्वात पॉवरफुल सेलिब्रेटी ठरला आहे. फोर्ब्स इंडिया २०१३ च्या सर्वात ताकदवर सेलिब्रेटींच्या यादीत किंग खानला लागोपाठ दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त झाला आहे. ४८ वर्षीय किंग खानला हा सन्मान त्यांच्या सुपर हिट चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या यशामुळे आणि लोकप्रियेतामुळे मिळाला आहे.

Dec 17, 2013, 08:01 PM IST

वसई-विरार मॅरेथॉनमध्ये सेलिब्रेटींची हजेरी

विरारमध्ये आज तिसऱ्या वसई-विरार मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. जवळपास दहा हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन अशा दोन गटांमध्ये ही मॅरेथॉन होतेय.

Oct 27, 2013, 09:26 AM IST

आता मुंबईतही ‘आयबीएल’ची धूम!

इंडियन बॅडमिंटन लीगचा धमाका आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. आज आणि उद्या मुंबईत आयबीएलच्या लढती रंगणार आहेत. सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा आणि ली चाँग वेई यासारख्या दिग्गज आणि ग्लॅमरस प्लेअर्सच्या लढतींची पर्वणी मुंबईकरांनासाठी असणार आहे. विशेष म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड सेलिब्रेटीही बॅडमिंटन कोर्टवर हजेरी लावणार आहे.

Aug 19, 2013, 02:47 PM IST

फेसबुक मॅसेज करायचा तर भरा पैसे....

सोशल नेटवर्किंग साईटमध्ये असणारी सगळ्यात मोठी वेबसाईट फेसबुकने आपल्या युजर्सवर आता चार्ज लावण्याची तयारी सुरू केली आहे.

Apr 9, 2013, 02:01 PM IST