‘त्या’ 46 नर्सेसची सुटका; उद्या भारतात परतणार
इराकमध्ये चाललेल्या यादवी युद्धात गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या 46 भारतीय नर्सेसची अखेर सुटका करण्यात आलीय.
Jul 4, 2014, 06:22 PM ISTसीरियात कार बॉम्बस्फोटात २५ ठार
सीरियामध्ये आज दोन कार बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटाता कमीत कमी २५ लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
Apr 10, 2014, 04:10 PM ISTसीरियाच्या यादवीत १०,००० लहानग्यांचा बळी - यूएन
देशात सैनिकांकडून लहान मुलांचा अनन्वित छळ होत असल्याच्या वृत्ताला सीरिया सरकारनं नेहमीच नकार दिलाय. `यूएन`च्या अहवालानं मात्र या वृत्ताला दुजोरा दिलाय. सीरियामध्ये सुरू असलेल्या सरकार आणि विरोधात यांच्या यादवी संघर्षात लहान मुलांना बळी दिलं जातंय, हे या अहवालातून धडधडीतपणे समोर आलंय.
Feb 6, 2014, 04:21 PM ISTशांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकन
सीरियावरील हल्ला ज्यांनी आपल्या मध्यस्थीनं रोखला, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नावाचं यंदाच्या शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केलंय.
Oct 3, 2013, 08:10 AM ISTट्युनिशियात वेगळाच वाद , याला म्हणतात `सेक्स जिहाद`!
सीरियामध्ये लढणा-या इस्लामी जिहादींशी शारीरसंबंध ठेवून गरोदर राहाणाऱ्या ट्युनिशियन महिलांचा सहभाग वाढत आहे. या प्रकाराला सेक्स जिहाद असं म्हणण्यात येत आहे.
Sep 22, 2013, 06:17 PM ISTसीरियावर हल्ला करणं गरजेचं- ओबामा
अमेरिका सीरियावर हल्ला करणं गरजेचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय. निरपराध लोकांवर रासायनिक अस्त्रांचा वापर करून सीरियानं आंतरराष्ट्रीय कायदा मोडला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Sep 11, 2013, 08:50 AM ISTसीरियावर कारवाई केल्यास खबरदार- पुतिन यांची चेतावनी
सीरियावर एकहाती कारवाई विरोधात रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतिन यांनी पश्चिमी राष्ट्रांना चेतावनी दिलीय. मात्र त्याचबरोबर दमिश्कनं जर आपल्या नागरिकांवर विषारी गॅसचा वापर केला असेल, तर त्यांच्याविरोधत सैनिकी कारवाईला आपण पाठिंबा देऊ, असंही पुतिन यांनी स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 03:57 PM ISTशांततेचा ठेका पश्चिमी राष्ट्रांकडे नाही - भाजप
सीरिया यादवी युद्धात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आणि सैन्य कारवाई अमान्य असल्याचं, भाजपनं आज संसदेत म्हटलंय.
Sep 4, 2013, 03:44 PM ISTधास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना
अमेरिकेनं असद सरकारविरुद्ध सीरीयावर हल्ला करण्याचा बेत आखल्याचं आता स्पष्ट झालंय. यामुळेच धास्तावलेल्या सीरियानं संयुक्त राष्ट्राकडे या संभावित हल्ल्याला रोखण्याची विनंती केलीय.
Sep 3, 2013, 09:54 AM ISTअमेरिका करणार सीरियावर हल्ला!
अमेरिकेनं अखेर सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याबाबत अमेरिकेतल्या संसदेचीही मंजूरी मिळाली असल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं.
Sep 1, 2013, 10:31 AM ISTसीरियावर हल्ल्याचा अद्याप निर्णय नाही - ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियावर हल्ला करण्याचा मूड आता बदललाय. सीरिया सरकारनं २१ ऑगस्ट रोजी आपल्याच जनतेवर केलेल्या कथित रासायनिक हल्ल्याचा परिणाम म्हणून दमिश्कवर हल्ला करण्याबद्दल आपण आत्तापर्यंत काहीही निर्णय घेतला नसल्याचं ओबामा यांनी म्हटलंय.
Aug 29, 2013, 03:19 PM ISTसीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका
सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.
Aug 28, 2013, 01:41 PM ISTसीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.
Aug 28, 2013, 12:17 PM ISTसीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी
दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय
Aug 22, 2013, 09:21 AM ISTचार देशांना घोषित केलं 'आतंकवाद प्रायोजक राष्ट्रं'
अमेरिकेने पुन्हा क्युबा, इराण, सुदान आणि सीरिया या चार देशांना दहशतवादाला प्रायोजत्व देणारे देश म्हणून घोषित केलं आहे. तसंच त्यांच्यावर शस्त्रांचा व्यापार आणि आर्थक सहाय्य इत्यादी गोष्टींवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
Aug 1, 2012, 09:05 AM IST