विमान प्रवास

अवघ्या ९९९ रुपयांत करा विमानानं प्रवास, स्पाइस जेटची ऑफर

बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटनं आपल्या डोमेस्टिक लाइन्सवर एसी-२ टायर ट्रेनच्या भाड्यापेक्षाही स्वस्त भाडं दिलंय. सोमवारपासून विमानसेवा तिकीटांवर ही ऑफर सुरू झालीय. कंपनीनं या अंतर्गत १.५० लाख सीट्सवर ही ऑफर दिलीय. विमान प्रवास भाडं असेल अवघे ९९९ रुपये. 

Apr 28, 2015, 10:30 AM IST

'GoAir'चा मोठा धमाका, अवघ्या ९९९मध्ये प्रवास!

विमान प्रवासाच्या दरात कपात करण्याचा नवा ट्रेंडच सुरू झालाय. यातच भर टाकत आता गो एअर या विमान कंपनीनं आज काही कालावधीसाठी नवी योजना सुरू केलीय. ज्यात कंपनीच्या नेटवर्कमध्ये एका बाजूनं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ९९९ रुपये भाडं ठेवलंय.

Mar 22, 2015, 05:00 PM IST

नागपूर- मुंबई विमान प्रवास महागला, ४० हजारांना एक तिकीट

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्या-परवा सुटी आहे. त्यामुळे नागपूरातून मुंबईपर्यंतची सर्व विमान तिकिटं विकली गेलीत. तिकीटे संपल्याने विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाढ केलेय. दरम्यान, तर नागपूर-पुणे-मुंबई मार्गावरील तिकीट ४०,००० पेक्षा जास्त दरात विकलं गेलंय. 

Dec 12, 2014, 04:07 PM IST

अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं करा विमान प्रवास!

आता अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं विमान प्रवास करू शकता. विमान सेवा देणाऱ्या कंपनीनं नुकतीच ही घोषणा केलीय. मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा आणि एअर एशियाचं बजेट विमान भाडं याचा मुकाबला करण्यासाठी जेट एअरवेजनं सर्व मार्गांवर आपल्या तिकीटांच्या किमती कमी केल्या आहेत. 

Sep 24, 2014, 12:08 PM IST

जेट एअरवेजची 600 रुपयांत विमान प्रवासाची ऑफर

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वस्त तिकीटांचा सध्या पाऊसच पडतोय. प्रत्येक एअरलाइन्स स्वस्त तिकीटांची विक्री करतेय आणि त्यामुळं प्रवाशांना चांगलाच फायदा होतोय. 

Sep 8, 2014, 03:16 PM IST

आता स्पाइसजेटनं करा 499 रुपयांत विमान प्रवास

देशातील दुसरी मोठी विमान कंपनी असलेल्या स्पाइसजेटनं स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना आजपासून सुरू केलीय. ‘अर्ली बर्ड’ अयं या योजनेचं नाव आहे. यात घरगुती शहरांमध्ये अवध्या 499 रुपयांत विमान प्रवासाचं तिकीट असेल. 

Sep 1, 2014, 06:05 PM IST

आता 600 रुपयांत करा विमान प्रवास, एअरएशिया इंडियाची ऑफर

डोमेस्टिक विमान प्रवासामध्ये नव्यानंच पाऊल ठेवलेली कंपनी एअरएशिया इंडियानं विमान प्रवासाच्या भाड्यासंदर्भात स्पर्धा सुरू केलीय. त्यांनी 600 रुपयात विमान प्रवास करायची संधी उपलब्ध करून दिलीय. 

Aug 26, 2014, 11:14 AM IST

सुवर्ण संधी! स्पाइस जेटकडून विमान प्रवासाची खास ऑफर

 सणासुदीच्या हंगामात फिरायला जाण्याचा विचार करत आहात. तर मग तुमच्यासाठी स्पाइसजेटनं एक चांगली ऑफर आणली आहे. स्पाइसजेटनं प्रवासासाठी आता कमीत कमी भाडं १,८८८ रूपये ठेवलंय. 

Aug 25, 2014, 02:14 PM IST

स्पाईसजेटची 'ती' योजना तत्काळ थांबविण्याचे आदेश

स्पाईसजेटनं मंगळवारी जाहीर केलेल्या एक रुपया तिकीट सेवेला डीजीसीएनं ब्रेक लावलाय. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)नं बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटच्या या स्कीमला तत्काळ थांबविण्याचे आदेश दिलेत.

Apr 2, 2014, 04:15 PM IST

हे एप्रिल फूल नाही... आता १ रुपयात विमानप्रवास!

आता तुम्ही १ रुपया आधार मूल्य असलेलं तिकीट घेऊन स्पाइस जेट एअरलाईन्सच्या डोमेस्टिक विमानाद्वारे प्रवास करू शकता. स्पाइसजेटनं आज डोमेस्टिक प्रवासासाठी तिकीटांचा तीन दिवसीय सेल लावल्याची घोषणा केलीय. या तिकीटाचं आधार मूल्य केवळी १ रुपया आहे. प्रवास करण्यासाठी तुम्हाला आधार मूल्याच्या व्यतिरिक्त फक्त टॅक्स आणि अधिक फी द्यावी लागेल.

Apr 1, 2014, 02:44 PM IST

एअर इंडिया विमानाची मिळणार अचूक माहिती

एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या आपल्या नातलगांचं अचूक ठिकाण यापुढे कळणार आहे. म्हणजेच एअर इंडियाची फ्लाईट नेमक्या क्षणी कुठे आहे याची अचूक माहिती आपल्याला मिळणार आहे.

Jan 14, 2014, 01:39 PM IST

जनतेच्या पैशांचा चुराडा, मंत्र्यांनी विमानवर उडविले ६ कोटी

महागाई आणि करांच्या ओझ्यामुळे सामान्य जनता दबली असताना जनतेचा पैसा मात्र मंत्र्यांकडून बेपर्वाईने खर्च केला जात आहे. आपल्या आरामदायक प्रवासासाठी मंत्र्यांनी तीन वर्षांत तब्बल कोट्यवधी रुपये केवळ विमान प्रवासावर उडवले आहेत. याचा आकडा तीन वर्षांत ६ कोटी २८ लाखावर गेलाय.

Oct 19, 2013, 01:33 PM IST

एसी ट्रेन तिकिटाच्या दरात आता विमान प्रवास

उन्हाळ्याच्या सुट्टीची चाहूल लागताच अनेक ट्रॅव्हल कंपन्या नवनव्या योजना काढतात. रेल्वे आणि विमान कंपन्याही नव्या योजना सुरू करतात. पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यंदा एअर इंडियाने नवी योजना सुरू केली आहे.

Mar 13, 2013, 07:16 PM IST

विमान प्रवाशांना बोर्डिंग पास मिळणार मोबाइलवर ?

विमानाचे तिकीट काढल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासापूर्वी बोर्डिंग पाससाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. कारण हा बोर्डिंग पास लवकरच तुमच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.

Mar 12, 2013, 05:05 PM IST