'माया' जमणावऱ्या मंत्र्यांवरची 'माया' आटली
उत्तर प्रदेशाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ प्रतिमेची छबी मतदारांवर ठसवण्यासाठी मुख्यमंत्री मायावतींनी चार मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. या हकालपट्टीसाठी कोणतेही कारण देण्यात आलेलं नाही. पण सूत्रांनी हे चौघे पक्ष विरोधी कारवाया आणि भ्रष्टाचारात आघाडीवर होते असं सांगितलं.
Dec 25, 2011, 11:52 PM ISTनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?
निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.
Dec 24, 2011, 04:22 PM ISTमायावतींचा केंद्रावर हल्लाबोल
उत्तर प्रदेशाच्या विभाजनाच्या मुद्यावर मुख्यमंत्री मायावतींना केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्रानं राज्याला कळवण्यापूर्वीच मिडीयात रिपोर्ट लीक केल्याचा आरोप मायावतींनी केलाय़. तसंच केंद्रानं उपस्थित केलेले सवाल म्हणजे घटनेचे उल्लंघन असल्याचा आरोपही मायावतींनी केला आहे.
Dec 21, 2011, 04:28 AM IST'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Dec 13, 2011, 09:21 AM ISTकाँग्रेसच्या युवराजांचे भावनिक आवाहन
काँग्रेसचे महासचिव राहुल यांनी उत्तर प्रदेशाचा कायापालट करुन येत्या पाच वर्षात देशातलं क्रमांक एकच राज्य बनवू असं आश्वासन दिलं. बाराबंकी इथे प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी तुम्हाला खात्री देतो की पाच वर्षात उत्तर प्रदेश उद्योग, व्यावसाय आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत क्रमांक एकच राज्य बनेल.
Nov 22, 2011, 03:18 PM ISTउत्तर प्रदेश विभाजनाचा प्रस्ताव मंजूर
उत्तर प्रदेशचं चार राज्यात विभाजन करण्याचा मायावतींचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव मंजूर होत असतानाच विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मात्र, तरीही प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव पुढे केंद्राकडे पाठवण्यात येईल.
Nov 21, 2011, 08:20 AM ISTउत्तर प्रदेशचं विभाजन
उत्तर प्रदेशचं विभाजन करण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटनं मंजुरी दिलीय.
Nov 15, 2011, 08:59 AM ISTसब माया है
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याचं ठरवलय. लखनौमध्ये ब्राम्हण संमेलन घेऊन त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Nov 13, 2011, 06:17 PM ISTराहुल गांधी हत्तीला काबूत आणणार का?
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ राहुल गांधी सोमवारी करणार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या सर्वसर्वा आणि मुख्यमंत्री मायावतींशी वाढत्या संघर्षाची सुरवातच या प्रचार मोहिमेने होणार आहे.
Nov 13, 2011, 05:35 PM ISTयुवराज, बंद करा ‘नाटकबाजी’- मायावती
विकास योजनांच्या लोकार्पण प्रसंगी मायावतींनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं की राहुल गांधींनी व्होटबॅंकेसाठी उत्तर प्रदेशात चालवलेली आपली नाटकं थांबवावीत. त्यांना एवढाच राग असेल तर, तो त्यांनी काँग्रेसशासीत प्रदेशात दाखवावा.
Nov 12, 2011, 01:31 PM ISTमायावतीचं काँग्रेसवर शरसंधान
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका समीप येऊ लागल्याने राज्यातलं वातावरण आता तापू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला आहे. काँग्रेसची नजर दलित मतांवर आहे आणि त्यासाठी ते सुशीलकुमार शिंदेंना पंतप्रधान बनवतील असं विधान मायावतींनी केलं आहे.
Oct 14, 2011, 02:07 PM IST