मंगळयान

मंगळयान मोहीम फत्ते, इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस

मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी ७.२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहोचले. अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी ७.४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.

Sep 24, 2014, 07:25 AM IST

इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

अंतराळातील दुनियेत ‘इस्रो’नं नवा इतिहास रचलाय. इस्रोचं मंगळयानाचं पहिलं पाऊल यशस्वी ठरलंय. इस्रोनं मंगळयानाच्या इंजिनचं यशस्वी परिक्षण केलंय. मंगळयानाच्या मेन लिक्विड इंजिनची टेस्ट यशस्वी झालीय. गेल्या 300 दिवसांपासून हे इंजिन बंद होतं. 

Sep 22, 2014, 04:23 PM IST

मंगळयानाचे 11.7 कोटी किलोमीटर अंतर पार

बंगळूरुः भारताचे मंगळ अवकाशयानने पृथ्वीपासून 11.7 किलोमीटरच्या अंतर पार केले आहे. त्यानंतर 'लाल ग्रह'च्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी पुढचे 92 दिवसामध्ये 2.4 कोटी किलोमीटर अंतर अजून पार करायचे आहे. 

Jun 25, 2014, 05:12 PM IST

२६ दिवसानंतर... मंगळयान पृथ्वीच्या कक्षेतून पडलं बाहेर!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थने सोडलेलं मंगळयान मध्यरात्री १२ वाजून ४४ मिनिटांनी यशस्वीरित्या पृर्थ्वीच्या कक्षेबाहेर पडलं.

Dec 1, 2013, 08:34 AM IST

<B> <font color=red> `मंगळ` प्रवासाचा खर्च रिक्षा-टॅक्सीपेक्षाही कमी! </font></b>

सध्या भारताला खरंच या मंगळ मोहिमेची गरज होती काय? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते... पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपण रिक्षा प्रवासासाठी जेवढे पैसे मोजतो त्यापेक्षा कमी खर्चात मंगळयान प्रवास करतंय.

Nov 13, 2013, 04:22 PM IST

मंगळयानालाही टोचणार इंजेक्शन!

मंगळयानात आलेला अथडळा दूर झाल्यानं भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवात जीव आलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे... ‘इंजेक्शन’!

Nov 13, 2013, 10:26 AM IST

‘मंगळयान’चे पाच हिरो!

मार्स ऑर्बिटर मिशन भारतासाठी सगळ्यात मोठं यश आहे... या मिशनमुळं चीन आणि जपानला मागं टाकत भारतानं नवी भरारी घेतलीय... या यशामागे देशाच्या पाच हिरोंचा सिंहाचा वाटा आहे.

Nov 6, 2013, 08:11 AM IST

१३५० किलोचं मंगळयान झेपावलं आणि...शास्त्रज्ञांवर अभिनंदनचा वर्षाव

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक सोनेरी पान आपल्या शिरपेचात खोवलंय. १३५० किलोचं मंगळयान यशस्वीपणे प्रक्षेपित करत हा इतिहास रचलाय. या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे.

Nov 5, 2013, 07:16 PM IST

पाहा... नेमकं काय आहे हे `मार्स मिशन`

इस्रोनं आपल्या मोहीमेला `मंगळयान` असं सुटसुटीत नाव दिलंय. १३५० किलो वजनाच्या या उपग्रहावर पाच शास्त्रीय उपकरणं आहेत. ही उपकरणं नेमकी कशी आहेत आणि त्यांच्या मदतीनं मंगळाविषयी कोणती नवी माहिती मिळू शकते... पाहुयात...

Nov 5, 2013, 08:31 AM IST

<b> मंगळयान : भारताची मंगळाला `भाऊबीज भेट`! </B>

आज दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावणार आहे.

Nov 5, 2013, 08:00 AM IST