पंतप्रधान मोदी

पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसामला रवाना

पीएम नरेंद्र मोदी आसाममधील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. पीएम मोदी या दरम्यान एक उच्च स्तरीय बैठक देखील घेणार आहेत. य़ामध्ये पूर्वेकडील राज्य खासकरुन आसाम, अरूणाचल प्रदेश, नगालँड आणि मणिपूरमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा अहवाल घेतला जाणार आहे. बैठकीत या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

Aug 1, 2017, 10:38 AM IST

मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 

Aug 1, 2017, 08:38 AM IST

कारगिल दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी काढली शहिदांची आठवण

कारगिल दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहिदांची आठवण काढली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं की, सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबत देशवासियांनी देखील युद्धात पूर्ण सहयोग दिला होता.

Jul 26, 2017, 10:27 AM IST

पंतप्रधान मोदींनी इस्राईलमध्ये केल्या ३ मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इस्राइलमधील भारतीयांना संबोधित करताना प्रगतीच्या दिशेने झेपावणाऱ्या युवा भारताचे चित्र सादर केले. भारत आणि इस्त्रायल  मिऴून जग बदलू शकतात हा विश्वास मोदींनी आपल्या भाषणात दिला.

Jul 6, 2017, 09:27 AM IST

पंतप्रधान मोदी करणार बड्या कंपन्यांच्या सीईओंना संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. इस्त्रायल आणि भारताच्या बड्या कंपन्यांच्या सीईओच्या संयुक्त परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर हैफा शहरात असणाऱ्या पहिल्या महायुद्धात मृत्यू पावलेल्यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून आपला दौरा संपवतील. दुपारनंतर मोदी जर्मनीला रवाना होतील.

Jul 6, 2017, 08:55 AM IST

पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.

Jul 5, 2017, 09:19 AM IST

पंतप्रधान मोदींना इस्राईल दौऱ्यात मिळणार सरप्राईज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्राईल दौरा आजपासून सुरु होत आहे. इस्राईल दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ऐतिहासिक दौरा ठरणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू प्रोटोकॉल तोडून विमानतळावर पोहोचणार आहेत. इस्राईलच्या दौ-यात पंतप्रधान मोदींना सरप्राइज मिळणार आहेत.

Jul 4, 2017, 11:28 AM IST

इस्राईलच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्राईल दौऱ्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सायबर सुरक्षासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होईल.

Jul 4, 2017, 09:55 AM IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केलं - पंतप्रधान मोदी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीवर आधारित एका छायाचित्रांच्या पुस्तकाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. हे उद्गार काढताना मोदींचा गळा दाटून आला होता.

Jul 3, 2017, 09:16 AM IST

रवींद्र जडेजाने मानले मोदींचे आभार

भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर रवींद्र जडेजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत. संपूर्ण देशाला फिट राहण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रोत्साहन देत असल्याने त्याने आभार मानलेत. 

Jun 29, 2017, 08:40 PM IST

३ वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान मोदी

तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही, असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदयाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झाली आहे. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Jun 26, 2017, 10:48 AM IST

अक्षय कुमार करणार पंतप्रधान मोदींची भूमिका

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अभिनेते अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी हे दिग्गज कलाकारही असतील.  

Jun 22, 2017, 03:17 PM IST

केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या जीवाला होता धोका

कोची मेट्रो रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यासाठी केरळला गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या जीवाला दहशतवाद्यांपासून धोका होता असा खुलासा पोलीस महासंचालक टी पी सेनकुमार यांनी केला आहे. शनिवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत पंतप्रधान मोदी कोचीला आले होते. कोची मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासाठी राजपाल पी. सदाशिवम, केंद्रीय मंत्री एम वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मेट्रोतून प्रवास ही केला.

Jun 21, 2017, 02:08 PM IST