नोट बंदीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका
सरकारचा नोटा बंदीचा निर्णय आता कृषी पुरक उद्योगाना ही सताऊ लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून कुकटपालनाचा व्यवसाय केला जातो तर काही सुशिक्षित बेरोजगार पूर्ण वेळ हा व्यवसाय करीत असतात सरकारच्या हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका या व्यवसायला बसला आहे या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात जवळपास ४० टक्के नुकसान सहन करावे लागते आहे.
Nov 26, 2016, 08:43 PM ISTनोटबंदीपूर्वी भाजपने आपला काळा पैसा केला पांढरा - अशोक चव्हाण
नोटबंदीआधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गवळीपुरा भागातील प्रचारसभेत बोलत होतेय. यावेळी खासदार हूसेन दलवाई यांनी नरेंद्र मोदींवर जहरी टिका करीत त्यांचा उल्लेख 'सैतान', अदानी-अंबानींचा 'दलाल' असा उल्लेख केलाय.
Nov 25, 2016, 11:43 PM ISTनागपूर अमरावती रोडवर गाडी सापडले १ कोटी रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंदी केल्यानंतर देशभरात ठिकाठिकाणी तपासणी सुरू आहेत. नागपूरमध्ये अशी कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरोने केली आहे.
Nov 24, 2016, 10:10 PM ISTघर घेणार असाल तर ही बातमी वाचून घ्या...
मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा परिणाम देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रावर पडला असून यामुळे घरांच्या किंमती झपाट्याने खाली उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत केलेल्या पाहणीनुसार येत्या ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत देशातील ४२ शहरांमधील घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २००८ नंतर विकासकांद्वारे निर्माण करण्यात आलेल्या देशभरातील गृहनिर्माण मालमत्तेची एकूण किंमत ८ लाख कोटी रुपये इतकी आहे.
Nov 24, 2016, 08:44 PM ISTउद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत
उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत
Nov 24, 2016, 08:03 PM ISTपंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली असून यात काय चर्चा होणार याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही.
Nov 24, 2016, 06:15 PM ISTभारताच्या नोटबंदीने का खुश आहे अमेरिका आणि चीन...
भारतात नोटबंदीनंतर नोटांच्या कमतरतेमुळे देशभरात ऑनलाइन खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या नोटबंदीचा भारतीय बॅंका तसेच व्यापाऱ्यांनाबरोबरच भारताबाहेरील व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या याचा फायदा होत आहे.
Nov 23, 2016, 09:52 PM ISTनोटबंदीचा ताडोबा व्याघ्र पर्यटनावर परिणाम
देशात चलनबदल झाल्यानंतर त्याचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर पर्यटनाच्या दृष्टीनं परिणाम दिसून येत आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांची संख्या घटली नसली, तरी वेळेवरच्या सफारी चांगल्याच प्रभावीत झाल्या आहेत.
Nov 22, 2016, 10:49 PM ISTनोटबंदी : मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शहरातील काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही मागण्यांचे निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
Nov 22, 2016, 02:26 PM ISTबिल गेट्स यांनी केलं मोदींच्या 'त्या' निर्णयाचं स्वागत
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बिल गेट्स यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशातील शॅडो इकोनॉमीला संपवण्यास मदत होईल आणि कॅशलेस इकोनॉमी वाढण्यास मदत होईल. नीती आयोगाने आयोजित केलेल्या ट्रांसफॉर्मिंग इंडियाच्या लेक्टरच्या दुसऱ्या सीरीजमध्ये बिल गेट्स यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मत मांडली.
Nov 17, 2016, 04:31 PM ISTनोटबंदीमुळे नेपाळच्या पंतप्रधानांना केला मोदींना फोन
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी लोकांकडे असलेले जुन्या भारतीय नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याची विनंती केली आहे.
Nov 15, 2016, 07:50 PM ISTनोट बंदीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होताहेत या अफवा
देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता.
Nov 14, 2016, 10:29 PM ISTनोट बंदी निर्णयाचे नागपुरात बैलगाडीवरून साखर वाटून स्वागत
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंदीविषयी घेतलेल्या निर्णयाचे उंट व बैलगाडीवरून साखर वाटून स्वागत करण्यात आले. नागपूर भाजपतर्फे बैलगाडीवरून साखर वाटप कार्यक्रमच आयोजन करण्यात आले होते.
Nov 13, 2016, 05:54 PM IST'चलन बदली'तला दिलदार हॉटेलवाला
हजार,पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, अनेकांची तारांबळ उडाली आहे.
Nov 11, 2016, 10:41 AM IST