छगन भुजबळ

"सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही", असं उत्तर महाराष्ट्र सदन प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर दिलं आहे. या प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ अडचणीत आले आहेत. आपल्यावरील कारवाई ही व्यक्तीगत आकस ठेऊन केली गेल्याचं गाऱ्हाण, छगन भुजबळांनी शरद पवारांकडे मांडलं होतं, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Jun 18, 2015, 07:36 PM IST

भुजबळांची बँक खाती गोठवण्याचे अधिकार 'एसीबी'ला!

मुंबई हायकोर्टाच्या नव्या आदेशामुळं माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडलीय. 

Jun 18, 2015, 07:01 PM IST

भुजबळ नंतर आता तटकरे - अजित पवार याचा नंबर...???

भुजबळ यांच्याविरोधात धडाक्यात सुरु झालेल्या कारवाईनंतर सिंचनबाबत कधी कारवाई होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Jun 18, 2015, 06:37 PM IST

'वाट पाहतोय सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत अखेर मौन सोडलं आहे. सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय, याची आम्ही वाट पाहतोय, अशी तिखट प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Jun 18, 2015, 04:29 PM IST

शिवसेनेचा भुजबळ यांच्यावर 'सामना'तून जोरदार हल्लाबोल

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केलाय. एसीबीच्या कारवाईमुळं भुजबळांच्या सामाजिक क्रांतीची सच्चाई भूकंपाप्रमाणे बाहेर आल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रेलखामधून करण्यात आली.

Jun 18, 2015, 11:43 AM IST

भुजबळांचा पवारांकडे धावा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मुंबईत भुजबळांनी पवारांची भेट घेतली, आपल्यावरील कारवाई ही आकसापोटी झाली असल्याची बाजू छगन भुजबळ यांनी शरद पवारांकडे मांडली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Jun 18, 2015, 11:30 AM IST

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर

Jun 17, 2015, 09:22 PM IST

'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी

छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.

Jun 17, 2015, 07:54 PM IST

"आपण योग्यवेळी या विषयावर बोलू" - पवार

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नेते छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले आहेत. यानंतर यावर शरद पवार काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या विषयी विचारलं असता, शरद पवार यांनी म्हटलं आहे, "आपण योग्यवेळी या विषयावर बोलू".

Jun 17, 2015, 05:27 PM IST