चक्रीवादळ

चेन्नईमध्ये वरदाह वादळाचे थैमान

चेन्नईमध्ये वरदाह वादळ धडकलंय. ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहताहेत. त्यामुळं इथून पुढचे दोन तास धोक्याचे असल्याचे सांगण्यात येतंय. सतर्कतेचा इशारा म्हणून NDRFच्या वीस तुकड्या तामिळनाडू किनारी तैनात करण्यात आल्यात. 

Dec 12, 2016, 03:32 PM IST

चक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत

 चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. 

Dec 7, 2015, 09:36 PM IST

चेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट

पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय. 

Nov 9, 2015, 01:05 PM IST

बिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वादळानं धुमाकूळ घातलाय. काल रात्री आलेल्या या वादळानं 32 जणांचा बळी घेतलाय तर 80 जण जखमी झालेत.

Apr 22, 2015, 03:00 PM IST

हुडहुडमुळे 24 जणांचा मृत्यू, पाहणीसाठी पंतप्रधान आज आंध्रला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुडहुड चक्रीवादळानं झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशाखापट्टणमला जातायेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळामुळं खूप नुकसान झालंय.  

Oct 14, 2014, 01:13 PM IST

‘हुडहुड’ चक्रीवादळाचा दणका, सहा जणांचा मृत्यू

हुडहुड चक्रीवादळाचा फटका आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना बसलाय. या जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसानं आणि जवळपास २०० किलोमीटर प्रती तास धावणाऱ्या वाऱ्यामुळे रविवारी सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर विशाखापट्टनममध्ये सर्वाधिक लोकांना या तडाख्याचा फटका बसलाय. 

Oct 13, 2014, 07:56 AM IST

'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट

एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Oct 10, 2014, 08:07 AM IST

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू

फिलिपिन्सला बसलेल्या हैयान या चक्रिवादळानं सुमारे दहा हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून वादळानं हजारो जणांना बेघर केलंय. या वादळाचा मोठा फटका मध्यवर्ती फिलिपिन्सलाही बसलाय. आतापर्यंत देशातली ही सर्वात मोठी आपत्ती आहे.

Nov 10, 2013, 05:38 PM IST

फायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू

फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.

Oct 12, 2013, 06:02 PM IST

अमेरिकेत ३२० ताशीचे चक्रीवादळ, २४ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या ओक्लोहोमा शहरात चक्रीवादळाने थैमान घातले असून, या वादळाने २४ जणांचा बळी एका दिवसात घेतला आहे.

May 22, 2013, 09:38 AM IST

मध्य अमेरिकेवर वादळी संकट

मध्य अमेरिकेमध्ये लागोपाठ आलेल्या ७० हून जास्त चक्रीवादळांमुळे आत्तापर्यंत कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. एवढंच नव्हे तर मेरिसविल हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले. चक्रीवादळाने केवळ घरंच उध्वस्त केली नाहीत, तर शाळा आणि दुकानंही जमीनदोस्त झाली आहेत.

Mar 3, 2012, 04:18 PM IST

थेन चक्रीवादळाने घेतले अठरा बळी

बंगालच्या उपसागरात आलेले 'थेन' चक्रीवादळ तामिळनाडूत घुसल्याने सहा जण ठार झाले आहेत. तामिळनाडूतील कडड्लोर आणि पॉंडेचरीमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पॉंडेचरीचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे.

Dec 31, 2011, 01:43 PM IST