गॅस सिलेंडर

आता एका क्लिकवर आपल्या गॅस सिलेंडरचे पैसे भरा

नवी दिल्ली : घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोदी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.

Jan 25, 2016, 10:31 AM IST

एक ट्वीट करा, वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल

रेल्वे मंत्रालयानंतर पेट्रोलियम आणि टेलिकॉम मिनिस्ट्रीने ट्वीटर हँण्डलवर 'तक्रार निवारण' करण्यावर भर दिला आहे. मिनिस्ट्रीने यासाठी कंट्रोल रूमही सुरू केला आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय देखील या प्रकारे अडचणी सोडवण्यावर भर देत आहे.

Jan 24, 2016, 11:46 AM IST

गॅस सिलिंडर सोबत वजन काटा बंधनकारक!

तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर मागविलात आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता सिलिंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्याला आपल्या सोबत वजन काटा आणावा लागणार आहे. हा वजन काटा आणला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत केंद्रातील सरकारने दिले आहेत.

Jun 11, 2015, 02:34 PM IST

सावधान! नाशिकनंतर आता नागपुरात सिलेंडरमधील गॅसचोरी प्रकरण उघड

घरगुती LPG सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या... कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे.. कारण अलिकडेच LPGमधील गॅस काढून ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे मोठं रेकेट नागपुरात उघडकीस आलंय. तेव्हा सावधान!!

Jun 10, 2015, 09:21 PM IST

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

May 24, 2015, 08:58 AM IST

सावधान! गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा डिलिव्हरी बॉय गजाआड

ग्राहकांना सावधान करणारी महत्त्वाची बातमी... तुमच्या घरी गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून प्रत्येकवेळी सिलेंडरचं वजन करूनच घ्या. तुमच्या गॅस सिलेंडरमधला गॅस आधीच काढून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

May 18, 2015, 06:45 PM IST

एका पाठोपाठ एक सिलेंडर लगेच मिळणार

घरात काम करणाऱ्या स्त्रियांसाठी एक खूश खबर. आता घरातला गॅस लगेच संपला तरी २१ दिवस थांबण्याची गरज नाही. कारण आता स्वयंपाकाचा गॅस संपलाच तर तुम्ही कधीही गॅसचं बुकींग करू शकता. तसेच गॅस एजंसीला देखील आता गॅस लवकर द्यावा लागणार आहे.

May 7, 2014, 06:35 PM IST

खूशखबर! अनुदानीत सिलेंडरची संख्या ९ वरून १२!

निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.

Jan 30, 2014, 03:37 PM IST