शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना दिलाय.
Sep 17, 2014, 02:36 PM ISTराज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
Jul 29, 2014, 06:04 PM ISTराखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, राज ठाकरेंविरोधात लढणार?
स्वत:चा 'राष्ट्रीय आम पक्ष' काढून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अपयश पत्करावं लागलं. त्यानंतर तिनं शनिवारी रिपब्नलिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.
Jun 29, 2014, 09:11 AM ISTनाराज आठवले मोदींच्या शपथविधीला गैरहजर
भारताच्या 15व्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलीय. या शपथविधी समारंभाला 4000 निमंत्रित उपस्थित होते. सार्कच्या प्रतिनिधी राष्ट्राच्या प्रमुखांसह देशातील नेते, सेलिब्रेटीही उपस्थित होते. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे रामदास आठवले हे मात्र शपथविधी समारंभाला गैरहजर राहिले.
May 26, 2014, 09:02 PM ISTआम्ही बापाचे बाप, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आम्ही ‘आप`चे बाप आहोत हे विधान केलं होतं. त्यावर उत्तर देत आयपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उत्तर दिलंय. आठवले म्हणतात, आम्हाला ‘आप`चा बाप होऊन ‘पाप` करायचे नाही. तुम्ही ‘आप`चे बाप असाल, तर आम्ही बापाचे बाप आहोत.
Jan 15, 2014, 01:56 PM ISTराज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?
सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.
Jan 14, 2014, 09:47 AM ISTरिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?
लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.
Dec 31, 2013, 08:59 PM ISTआठवलेंना पुन्हा टाळलं, आरपीआय फणफणली!
मुंबईत आज संध्याकाळी होणाऱ्या शिवसेना-भाजपच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज झालेत.
Jul 17, 2013, 02:35 PM IST`बाळासाहेबांच्या नावावर मनसेचं नाटक`
`ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी म्हणजे मनसेचं निव्वळ नाटक आहे` अशी टीका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलीय.
Jul 2, 2013, 03:37 PM IST‘फ्री वे’ अडवला… आरपीआय मनसेच्या वाटेवर?
मुंबईतल्या ‘ईस्टर्न एक्सप्रेस फ्री’वेच्या नामकरणावरून सध्या वाद सुरू आहे. ‘फ्री वे’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत रिपब्लिकन पक्षानं फ्रीवेवर आंदोलन केलं.
Jun 30, 2013, 03:18 PM ISTईस्टर्न फ्री वेला बाळासाहेबांचे नाव द्या- मनसे
मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी मनसेनं केलीये. विधानसभेतले पक्षाचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलंय.
Jun 29, 2013, 09:36 PM ISTएक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
Mar 8, 2013, 09:41 AM IST‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.
Mar 8, 2013, 08:43 AM ISTमहायुतीला मनसेचं ‘इंजिन’?
राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2013, 08:24 AM ISTराज ठाकरेंनी प्रस्ताव दिला तर विचार करूः आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत यावी असं काही जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरे आणि माझं मतंही महत्त्वाचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.
Jan 3, 2013, 09:24 PM IST