आंध्र प्रदेश

धक्कादायक: अंध विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण

आंध्र प्रदेशच्या काकिनाडामध्ये एका अंध शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकानं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलीये.

Jul 21, 2014, 05:48 PM IST

देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म

देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.

Jun 2, 2014, 08:17 AM IST

एव्हरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची मुलगी पूर्णा!

जर तुमचा आत्मविश्वास उदंड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशची आदिवासी मुलगी पूर्णा... पूर्णा 13 वर्ष 11 महिने वयाची आहे आणि तिनं जगातील सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी म्हणून नाव नोंदवलंय.

May 25, 2014, 04:10 PM IST

प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर

लोकसभेत मंजूर झालेले तेलंगणा विधेयक राज्यसभेतही प्रचंड गदारोळानंतर मंजूर झाले. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता देशात २९ राज्ये होणार आहेत.

Feb 20, 2014, 08:42 PM IST

आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींचा राजीनामा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी मुख्य़मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Feb 19, 2014, 02:00 PM IST

तेलंगणा विधेयक : १७ गोंधळी खासदार निलंबित

तेलंगणा विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. विधेयकावरून तेलंगणा समर्थक आणि विरोधक खासदारांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी राजगोपाल या काँग्रेसच्या खासदारांसह १७ खासदारांना निलंबित करण्यात आलंय. या सर्व गोंधळानंतर संसंदेचं कामकाज १७ फेब्रुवारी म्हणजे सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय.

Feb 13, 2014, 03:56 PM IST

तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा

आंध्र प्रदेश राज्याचे विजन करून नवे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार हंगामा झाला. तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा पाहायला मिळाला. हाणामारीचा प्रयत्न झाला. काही खासदारांनी मिरटी स्प्रेचा वापर केला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

Feb 13, 2014, 02:00 PM IST

आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य

आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.

Feb 7, 2014, 11:14 PM IST

५९ बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या टोळीला अटक

आंध्र प्रदेश पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या नऊ जणांनी दोन वर्षात ५९ महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचं चौकशीत पुढं आलंय. या टोळीनं आपला गुन्हा मान्य केलाय.

Jan 15, 2014, 01:02 PM IST

तेलंगणात ‘सोनियाम्मा’ची मूर्ती तयार मंदिरही लवकरच

आपल्या देशात व्यक्तीपूजेचा सूर खूप दिसतो. आता तर कलाकार, क्रिकेटपटूंसोबत राजकारण्यांचेही मंदिर बनू लागले आहेत. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आंध्रप्रदेशच्या एका आमदारानं सोनिया गांधींना `माँ तेलंगण`चा दर्जा देत, त्यांचं मंदिर उभारणार असल्याचं सांगितलंय.

Jan 9, 2014, 04:10 PM IST

लहेर चक्रीवादळाची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश

लहेर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. ऊद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यसरकारने या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

Nov 27, 2013, 10:53 AM IST

आंध्र प्रदेशला चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा तडाखा

आंध्र प्रदेशला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. हेलेन या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. फायलिन वादळानंतर हेलेनने तडाखा दिला आहे. या वादळबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

Nov 22, 2013, 04:34 PM IST

व्होल्वो बसला आग, ४५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बंगळुरु-हैदराबाद महामार्गावर कोठाकोटा येथे व्होल्वो बसची इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागून ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशमधील महबूबनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Oct 30, 2013, 10:11 AM IST

जामा मशिदीची रेकीचा संशय, चौकशी पथक आंध्र प्रदेशात

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात जामा मशिदीची रेकी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परभणी पोलीस आणि राज्य एटीएस पथकानंही याची दखल घेतली असून सोलापूर आणि आंध्र प्रदेशमध्येही चौकशीचं एक पथक रवाना झालंय. काय आहे. काय आहे हा सारा प्रकार. एक रिपोर्ट.

Oct 19, 2013, 11:35 AM IST

<b>`फायलिन`ची तीव्रता कमी केली मुंबईतील प्राध्यापकाने! </b>

`फायलिन` हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे खूप मोठी वित्त आणि जीवीत हानी होऊ शकते. याबाबतची कल्पना पाच दिवसांपूर्वीच कपिल गुप्ता या मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाने दिली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात सरकारला यश आले आणि मोठी हानी टाळण्यात सरकार यशस्वी झाले आहे.

Oct 14, 2013, 01:53 PM IST