हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार? जाणून घ्या काय आहेत Transfer Window चे नियम?

IPL Transfer Window 2024: आयपीएलसाठी पहिली ट्रान्सफर विंडो उघडली आहे. या ट्रान्सफर विंडोची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलीये. याला ट्रेडिंग विंडो असेही म्हणतात.

सुरभि जगदीश | Updated: Nov 25, 2023, 09:13 AM IST
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार? जाणून घ्या काय आहेत Transfer Window चे नियम? title=

IPL Transfer Window 2024: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाच्या चाहत्यांना आता आयपीएल 2024 चे वेध लागले आहेत. या आयपीएल सिझनचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामुळे आयपीएलसाठी पहिली ट्रान्सफर विंडो उघडली आहे. या ट्रान्सफर विंडोची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलीये. याला ट्रेडिंग विंडो असेही म्हणतात. या अंतर्गत दोन फ्रँचायझी परस्पर संमतीने आवडत्या खेळाडूंना ट्रेड करू शकतात. मुख्य म्हणजे यासाठी खेळाडूंचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.

कोणत्या खेळाडूंचं झालं ट्रेडिंग

आयपीएल 2024 साठी आतापर्यंत दोन खेळाडूंची ट्रेडिंग झाल्याची माहिती आहे. या महिन्यात म्हणजे 3 नोव्हेंबर रोजी रोमॅरियो शेफर्ड 2024 सीझनसाठी ट्रेड केलेला पहिला खेळाडू ठरला. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने शेफर्डला लखनौ सुपरजायंट्सला 50 लाखांना ट्रेड केलंय. यानंतर राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनऊ फ्रँचायझी यांच्यात करार झाला. राजस्थानने देवदत्त पडिक्कलच्या जागी वेगवान गोलंदाज आवेश खानला घेण्याचा निर्णय घेतला. 

हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतणार?

सध्या या ट्रेडिंगमध्ये हार्दिक पंड्याच्या नावाचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतण्यावर हा ट्रेड होण्याची शक्यता आहे. यानुसार पांड्या त्याच्या जुन्या संघ मुंबईत परत येऊ शकतो. मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलंय. तर हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला प्रथमच विजेतेपद मिळवून दिलं होतं.

ट्रान्सफर विंडोचे नियम काय आहेत?

  • आयपीएलच्या नियमांनुसार, एका खेळाडूला दोन प्रकारे ट्रेड केलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजे एखाद्याला त्या खेळाडूची फ्रेंचायझी स्वतः विकण्याची ऑफर देते. किंवा दुसरी म्हणजे, फ्रँचायझीने खेळाडू विकत घेण्यात रस दाखवला पाहिजे.
  • एखाद्या खेळाडूला ट्रेड करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये फक्त पैशाबद्दल चर्चा व्हायला हवी.
  • आयपीएल गव्हर्निंग काऊंसिची परवानगी नसेल तर ट्रेड होऊ शकत नाही. म्हणजेच आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचीही मान्यता आवश्यक असणार आहे.
  • एकापेक्षा जास्त फ्रँचायझींनी खेळाडू खरेदी करण्यात रस दाखवला, तर संपूर्ण प्रकरण विकणाऱ्या फ्रेंचायझीवर येऊन अडकतं. ती फ्रेंचायझी तिच्या आवडीच्या फ्रँचायझीसह करार करू शकते.
  • एखाद्या खेळाडूचा करार करण्यापूर्वी किंवा त्याला दुसऱ्या टीममध्ये ट्रेड करण्यापूर्वी, त्याची संमती घेणं आवश्यक असचं. तसंच, फ्रेंचायझी 'आयकॉन' खेळाडूचा करार करू शकत नाही.