IPL 2022 : आयपीएल 2022 चा सीजन मुंबई इंडियन्ससाठी इतका चांगला ठरलेला नाही. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आतापर्यंत लागोपाठ 8 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इडियन्स अनेकांची फेव्हरेट टीम राहिली आहे. अनेक दिग्गज खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ असताना देखील मुंबईच्या संघाला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या चिंता वाढल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईचा संघ नेहमीच चांगल्या खेळाडूंमुळे एक मजबूत संघ राहिला आहे. पण या सीजनमध्ये त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही.
मुंबई इंडियन्सला लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागत असल्याने मुंबईसाठी लकी ठरणाऱ्या आजी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी स्टँडमध्ये बसून नेहमी प्रार्थना करताना दिसणाऱ्या आजी यंदाच्या सीजनमध्ये दिसलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईच्या संघाला आता आजींच्या दुवा हव्या आहेत. अशी चर्चा होऊ लागली आहे.
2017 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पुणे सुपरजायंट यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान त्या पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आल्य़ा होत्या. अतिशय चुरशीच्या सामन्यात मुंबईने फायनल मारली आणि ट्रॉफी उचलली.
अभिषेक बच्चन यांनी एका ट्विटमध्ये खुलासा केला होता की, त्या आजी दुसऱ्या कोणी नसून नीता अंबानी यांच्या आई (Neeta Ambani mother) आहेत. नीता अंबानी या मुंबई संघाच्या मालक आहेत.