हार्दिकच्या साखरपुड्यावर विराटने अशी दिली प्रतिक्रिया

नताशाकडून हार्दिक क्लीन बोल्ड, विराट म्हणतो...

Updated: Jan 2, 2020, 06:30 PM IST
हार्दिकच्या साखरपुड्यावर विराटने अशी दिली प्रतिक्रिया

मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविच यांचा साखरपुडा झाला आहे. हार्दिकने इन्स्टाग्रामवर नताशासोबतचा फोटो टाकून त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली. 'मै तेरा तू मेरी जाने सारा हिंदूस्तान' असं कॅप्शन हार्दिकने या फोटोला दिलं आहे. यासोबतच हार्दिकने फोटोला अंगठीची इमोजी दिली.

हार्दिक पांड्याच्या साखरपुड्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही हार्दिक पांड्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सुखद धक्का असल्याची कमेंट विराटने हार्दिक-नताशाच्या फोटोवर केली आहे.

साखरपुड्याची घोषणा करण्याआधी काहीवेळापूर्वी हार्दिकने नताशासोबतच्या रिलेशनशीपची कबुली दिली होती.  त्यानंतर लगेचच हार्दिकने साखरपुड्याची घोषणा केली. 'माझ्या फटाकडीसोबत नव्या वर्षाची सुरुवात', असं कॅप्शन देत हार्दिकने नताशासोबतचा फोटो शेयर करुन त्याच्या प्रेमाची कबुली दिली. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या या फोटोमध्ये हार्दिक पांड्याने नताशाचा हात धरला आहे. पांड्याने या फोटोसोबत हृदयाचं इमोजी टाकलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Starting the year with my firework

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

अनेक दिवसांपासून हार्दिक आणि नताशा एकमेकांना डेट करत आहेत. नताशा हार्दिकसोबत अनेक पार्ट्यांमध्ये आणि त्याच्या घरीही पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपबाबत अनेकवेळा चर्चाही झाल्या आहेत. आता अखेर हार्दिक पांड्याने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.