Pakistan Team: पाकिस्तान टीमच्या दुःखात भर; एशिया कपच्या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका

गुरुवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेने शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचं एशिया कप जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. अशातच पाकिस्तानच्या टीमला अजून एक धक्का बसला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 15, 2023, 12:37 PM IST
Pakistan Team: पाकिस्तान टीमच्या दुःखात भर; एशिया कपच्या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका title=

Latest ICC ODI Ranking: एशिया कपच्या फायनलचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. 17 सप्टेंबर रोजी टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. गुरुवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेने शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचं एशिया कप जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. अशातच पाकिस्तानच्या टीमला अजून एक धक्का बसला आहे. 

पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्या सामन्यानंतर आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये मोठा उलटफेर झालाय. सध्याच्या यामध्ये पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. दरम्यान पाकिस्तानच्या या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला. टीम इंडिया सध्या या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एका रात्रीत बदलली ICC ODI Ranking

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची टीम ऑस्ट्रेलियासोबत वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर वनडे क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. यावेळी पाकिस्तानच्या खात्यात 115 पॉईंट्स होते. तर टीम इंडियाचे 116 आणि ऑस्ट्रेलियाचे 118 पॉईंट्स आहेत. पाकिस्तानच्या या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये.

टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी

जर टीम इंडियाला नंबर 1 बनायचं असेल तर एशिया कपमध्ये 15 सप्टेंबर रोजी टीम इंडिया विरूद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यानंतर अंतिम फेरीतही श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवावा लागेल. टीम इंडियाला नंबर वन होण्यासाठी हे पुरेसं ठरणार नाही. एशिया कप जिंकण्याबरोबरच त्यांना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सिरीजवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागणार आहे. ही सर्व समीकरणं जुळून आली तर टीम इंडिया नंबर वन होऊ शकते.

एशिया कपच्या फायनलमध्ये रंगणार भारत-श्रीलंका

गुरुवारी एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान ( Pakistan vs Sri Lanka ) यांच्यात सामन्यात रंगला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 42 ओव्हर्सचा ठेवण्यात आला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 252 रन्स केले होते. याला आव्हानाचा सामना करताना श्रीलंकेच्या टीमने 8 विकेट्स गमावून विजय मिळवला. हा विजय मिळवत श्रीलंकेने फायनल सामन्यामध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे.