जगात भारी सूर्याचं मराठी! प्रत्येक शॉटला मराठी नाव, यादवचं मराठी ऐकून तुमचीही बोबडी वळेल

सध्या सूर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतोय. या मजेशीर व्हिडिओत तो मुंबईच्या क्रिकेटशी संबंधित शब्द स्पष्ट करताना दिसतोय.

Updated: Nov 7, 2022, 11:18 PM IST
जगात भारी सूर्याचं मराठी! प्रत्येक शॉटला मराठी नाव, यादवचं मराठी ऐकून तुमचीही बोबडी वळेल title=

Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये (T 20 world cup) सध्या टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav)  बॅट तुफान सुरु आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 3 अर्धशतकं झळकवली आहेत. केवळ भारतातीलच नाही तर इतर देशातील दिग्गज देखील त्याचं कौतुक करतायत. अशातच सध्या सूर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतोय. या मजेशीर व्हिडिओत तो मुंबईच्या क्रिकेटशी संबंधित शब्द स्पष्ट करताना दिसतोय.

झिब्माव्बेविरूद्धच्या सामन्यानंतर त्याचा हा व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. मात्र, हा व्हिडीओ त्याच्या खेळीचा नसून त्याच्या मुंबईतील हिंदी आणि मराठी शब्द समजावून सांगणारा आहे. या मजेशीर व्हिडिओमध्ये तो अशा या शब्दांचा आणि क्रिकेटमधील गोष्टींचा अर्थ सांगतोय. हे अर्थ असे आहेत जे लोकांना माहित नाहीयेत.

सर्वप्रथम सूर्यकुमारला काकडी शॉट म्हणजे काय असं विचारण्यात आलं, त्यावर सूर्याने सांगितलं की, तो शॉट म्हणजेच बॉल आणि बॅट एकमेकांशी संपर्क साधतात आणि यावेळी एकदम कडक आवाज येतो. याला काकडी शॉट म्हणतात. त्याचवेळी त्याने 'बल्ब निकलना' अर्थ चांगला कॅच घेणं आहे असं सांगितलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

भिंगरीचा अर्थ विचारला असता सूर्याने, टर्निंग ट्रॅकला भिंगरी म्हणतात असं सांगितल. तसंच, कावला उडवला म्हणजे ज्यावेळी तुम्ही सिक्स मारण्याचा प्रयत्न करता पण बॉल सरळ वर जातो आणि तुमचा कॅच जातो. 

सूर्याचा नवा विक्रम

टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav)  झिम्बाब्वे (Zimbabwe)  विरुद्ध 35 धावा करून इतिहास रचला आहे. या धावांसह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा सूर्यकुमार भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका वर्षात भारतासाठी असा पराक्रम इतर कोणत्याही फलंदाजाने केला नव्हता.

सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) याने झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध संघाच्या शेवटच्या गट सामन्यात 35 धावा पूर्ण केल्यामुळे क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इतिहास रचला.सूर्यकुमार यादव आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.