मुंबई : माजी कर्णधार सौरव गांगुली यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI च्या नव्या अध्यक्षपदी सौरव गांगुली (दादा) यांची निवड होण्याची शक्यता आहे. 23 ऑक्टोबर रोजी BCCI ची निवडणूक होणार असून मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सभेत हा महत्वाचा निर्णय होऊ शकतो.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित झाली आहे. या पदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्यातुलनेत गांगुलीला अधिक पसंती मिळत आहे. यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होऊ शकते. अरूण धुमाळ हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत. जर गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली तर ते सप्टेंबर 2020 पर्यंत या पदावर राहू शकतील.
Sourav Ganguly set to be new BCCI President: Sources
Read @ANI story | https://t.co/oHW5Bq2MeK pic.twitter.com/11TVQOtuaD
— ANI Digital (@ani_digital) October 13, 2019
सोमवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारिख आहे. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या निवडणुकीकरता नामांकन भरण्याची 14 ऑक्टोबर ही शेवटची तारिख आहे. ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी मोठी लढत पाहायला मिळाली. गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाली तर कर्नाटचे बृजेश पटेल यांची आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. ब्रिजेश पटेल यांच्यासाठी तमिळनाडूचे एन.श्रीनिवासन यांनी लॉबिंग केले होते. परंतु अनेकांनी त्याला विरोध केला आणि अखरे गांगुली यांचे नाव पुढे आले.