मुंबई : एस श्रीसंत हा केरळातील पहिला फास्ट बॉलर ज्याने रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक केली आहे.
6 जानेवारी 1983 मध्ये शांतकुमारन श्रीसंत याचा जन्म झाला. आपल्या खेळाबरोबरच तो भारतातील सर्वाधिक वादात अडकणारा देखील खेळाडू आहे.
त्याच्या वाढदिवसादिवशी जाणून घेऊया
1) गोपू : कोठामंगलम, केरळात जन्मलेल्या श्रीसंतला मित्र परिवार आणि कुटुंबिय गोपू या नावाने संबोधतात
2) केरळचा पायनियर : श्रीसंत हा केरळचा पहिला फास्ट बॉलर असून त्याने रणजी ट्ऱ़ॉफीत हॅट्रिक केलं. भारतकडून आंतरराष्ट्रीय टी 20 खेळणारा हा खेळाडू
3) कानाखाली : हरभजन सिंह आणि श्रीसंत आपली अलोकप्रिय कानाखाली अद्याप विसरलेले नाही. आयपीएलच्या उद्घाटन सत्रात श्रीसंत किंग्स इलेव्हन पंजाबमधून खेळत होता. हरभजन सिंह मुंबई इंडियन्ससोबत खेळत होता. तेव्हात त्याचा संघ हरण्याच्या वाटेवर होता. त्यावेळी श्रीसंत हरभजनकडे गेला. दोघांच्यामध्ये नेमकं काय झालं ते कळलं नही. मात्र सामना संपण्याच्या वेळी हरभजनने श्रीसंतच्या गालावर एक जोरदार कानाखाली मारली. श्रीसंत अगदी ढसा ढसा रडू लागला.
4) सचिनला देखील दिला नाही सन्मान : श्रीसंतने चॅलेंजर ट्रॉफी 2005 -06 मध्ये सचिन तेंडुलकरची विकेट घेऊन सगळ्यांनी प्रभावित केलं. सचिन 4 रन करत होता तेव्हा त्याने एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यावेळी त्याने सचिनच्या विकेटं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर ईरानी ट्रॉफी 2013 मध्ये मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडियाचा सामना खेळला. श्रीसंतने सचिनला बाऊंसर मारला. त्यावेळी सचिनच्या 95 धावा झाल्या होता. त्यावेळी बॉल सचिनच्या खांद्याला लागला. त्यानंतर सचिनने श्रीसंतच्या बॉलवर शानदार कव्हर ड्राइव मारत बॉल सीमापार केला. त्यानंतर सचिनने मैदानात फिजिओला बोलावलं.
5) स्पोर्ट्स शॉप : श्रीसंतने एस 36 नावाचं स्पोर्ट्स शॉप हल्लीच सुरू केलं आहे.