धोनीला ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट का? रमीझ राजाचा सवाल

पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर रमीझ राजानं धोनीला देण्यात आलेल्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टवर आक्षेप नोंदवला आहे.

Updated: Jul 6, 2017, 04:37 PM IST
धोनीला ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट का? रमीझ राजाचा सवाल  title=

मुंबई : पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर रमीझ राजानं धोनीला देण्यात आलेल्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टवर आक्षेप नोंदवला आहे. धोनी आता टेस्ट क्रिकेट खेळत नसल्यामुळे त्याला बीसीसीआयनं ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट देता कामा नये, असं रमीझ राजा म्हणाला आहे.

बीसीसीआयनं टेस्ट क्रिकेटचा आदर ठेवावा आणि धोनीचं ए ग्रेडचं कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावं, अशी मागणी रमीझ राजानं केली आहे. टेस्ट क्रिकेट वाचवण्यासाठी ग्रेड ए कॉन्ट्रॅक्ट फक्त टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्यांनाच देण्यात यावं. टेस्ट क्रिकेटची चॅम्पियनशीप सुरु करावी, असं रमीझ राजा म्हणाला आहे.

या वक्तव्यामुळे धोनीचे फॅन्स मात्र रमीझ राजावर तुटून पडले आहेत. ट्विटरवर धोनीच्या फॅन्सनी रमीझ राजावर सडकून टीका केली आहे. भारतीय क्रिकेटकडे एवढं लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान क्रिकेटकडे बघा, असा सल्ला धोनीच्या फॅन्सनी रमीझ राजाला दिला आहे.