लंडन : न्यूझीलंडच्या महिला संघाने पुन्हा एकदा वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एकतर्फी सामन्यात आर्यलंडविरुद्ध ४०० धावाहून अधिक धावा तडकावल्या. या सामन्यात न्यूझीलंडने आर्यलंडविरुद्ध तब्बल ३०० धावांहून अधिक धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडच्या महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ४१८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या महिला संघाने यानंतर आर्यलंडला ३५.३ षटकांत ११२ धावांवर रोखले. या सामन्यात न्यूझीलंडने ३०६ धावांनी विजय मिळवला.
न्यूझीलंडकडून सोफी डेवाईनने १०८ धावांची खेळी केली. तिने ५९ चेंडूत शतक साकारले. प्रत्युत्तरादाखल आयर्लंडचा एकही फलंदाज जास्त काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. कर्णधार लारा डेलानीने ३० धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त सेसेलिया जायस आणि शाना कवानाग यांनी अनुक्रमे २६ आणि १८ धावा केल्या.
Mind the windows
Sophie Devine was in beast-mode in the 2nd ODI today
58-ball - fastest ever by a WHITE FERN #IREvNZ #NorthernTour pic.twitter.com/cKJ45usilb— WHITE FERNS (@WHITE_FERNS) June 10, 2018
न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या वनडेतही ४९० धावा केल्या. हा स्कोर पुरुष आणि महिला वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक आहे. न्यूझीलंडच्या संघाने या सामन्यात २४६ धावांनी विजय मिळवला होता.