मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या परिवारासोबत काही निवांत क्षण जगताना दिसत आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यानंतर धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झीवासोबत भटकंती करत आहे.
महेद्रसिंग धोनी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावरून आल्यानंतर त्याला निडास ट्रॉफी मॅचेसदरम्यान आराम देण्यात आला. या वेळेचा सदुपयोग करत धोनी कुटुंबासोबत काही शांत क्षण जगताना दिसत आहे.
महेंद्रसिंग धोनी पुन्हा CCK म्हणजेच चैन्नई सुपरकिंग या संघातून खेळताना दिसणार आहे. मागील दोन वर्ष या संघावर बॅन टाकण्यात आला होता.
Game time for Ziva and Mahi she is all around the ground.. cuteness at its best. @msdhoni @Circleofcricket pic.twitter.com/ToHQj6cOm0
— Ishan Yadav Mahal (@BeingIshanCric) October 15, 2017
धोनीप्रमाणेच त्याची मुलगी सोशलमीडियावर खूपच हीट आहे. काही दिवसांपूर्वी फूटबॉलच्या ग्राऊंडवर झीवा धोनीला पाणी पाजत असल्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.