IND vs AUS : Mohammed Siraj आणि Steven Smith यांच्यात मैदानात राडा; नागपूर टेस्टचा पहिला दिवस गाजला

पहिल्याच टेस्ट सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्टेलियाच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. दरम्यान या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steven Smith) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांच्यामध्ये खटके उडाल्याचं पाहायलं मिळालं.

Updated: Feb 9, 2023, 03:49 PM IST
IND vs AUS : Mohammed Siraj आणि Steven Smith यांच्यात मैदानात राडा; नागपूर टेस्टचा पहिला दिवस गाजला title=

IND vs AUS, 1st Test: गुरुवारचा दिवस हा क्रिकेट प्रेमींसाठी मोठा दिवस होता. आजपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border–Gavaskar Trophy) सुरुवात झाली नागपूरच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (IND vs AUS) यांच्यामध्ये पहिली टेस्ट मॅच रंगली आहे. पहिल्याच टेस्ट सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्टेलियाच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. दरम्यान या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steven Smith) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांच्यामध्ये खटके उडाल्याचं पाहायलं मिळालं.

Mohammed Siraj आणि Steve Smith यांच्यामध्ये वाजलं

ऑस्ट्रेलियाच्या टीमने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला आली असताना ऑस्ट्रलियाला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट देखील गेली. ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट गेल्या असताना 8 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर विकेट मिळण्याची अपेक्षा असतानाच अंपायरने आशेवर पाणी फेरलं. 

नेमकं काय घडलं?

8 व्या ओव्हरमध्ये सिराजने स्टिव स्मिथला बॉल टाकला. सिराजने यावेळी गुड लेंथ बॉल फेकला आणि स्मिथने यावर डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॉल टप्पा घेऊन इनस्विंग झाला आणि थेट थाई पॅड्सवर जाऊन आदळला. ज्यानंतर गोलंदाजाने एलबीडब्लूसाठी अपील केलं. मात्र यावेळी अंपायरने याला नॉट आऊट करार दिला. दरम्यान सिराजने अपील केल्यामुळे स्मिथ काहीसा नाराज झाला आणि रागाच्या भरात त्याने सिराजला रिएक्शन दिली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

भारतीय गोलंदाजांची कमाल

कॅप्टन पॅट कमिन्सचा (Pat Cummins) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फेल ठरला. सुरूवातीला रोहितने मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपवला. त्याचं फळ टीम इंडियाला मिळालं. 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू संघाला पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 15 षटकांत 2 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या.  त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही.

शमी सिराजच्या जोडीनंतर रोहितने (Rohit Sharma) पीचचा अंदाज घेऊन पाच महिन्यांनंतर कमबॅक करणाऱ्या रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) हातात बॉल सोपवला. जडेजाने Labuschagne चा विकेट काढला आणि भारताला आणखी एक विकेट काढून दिली. त्यानंतर अक्षर पटेल (Axar Patel) आणि आश्विनच्या तिघाडीचा वापर करत भारताने उर्वरित फलंदाजांना तंबुत परतवलं. जडेजाने 22 ओव्हरमध्ये 47 धावा दिल्या आणि 5 विकेट नावावर केले. तर आश्विनने 15 ओव्हरमध्ये 42 धावा देत 3 गडी बाद केलेत.