mega auction ipl 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या खास पंटरला CSK दाखवणार बाहेरचा रस्ता

आयपीएल 2022 साठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मेगा ऑक्शन होणार आहे. 

Updated: Nov 25, 2021, 07:56 PM IST
mega auction ipl 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या खास पंटरला CSK दाखवणार बाहेरचा रस्ता title=

मुंबई: आयपीएल 2022 साठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मेगा ऑक्शन होणार आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. IPL 2021 च्या अंतिम सामन्यात CSK ने KKR चा 27 धावांनी पराभव करून चौथे विजेतेपद पटकावलं.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील हा संघ पुढील हंगामात पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. पुढच्या हंगामासाठी CSK ला केवळ 4 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. 

नुकतीच सीएसकेच्या पुढच्या मोसमात कायम ठेवल्या जाणार्‍या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे महेंद्रसिंह धोनीचा अनेक वर्षांपासून खास असलेल्या खेळाडूचे नाव यामध्ये नाही. 

हा खेळाडूला 2022 च्या हंगामासाठी बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून माहीचा खास मित्र सुरेश रैना असल्याची माहिती समोर आली आहे. 

CSK संघ ऑलराउंडर रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि धोनीला रिटेन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर मोइन अलीला रिटेन करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. यावेळी सुरेश रैनाला रिटेन करण्याबाबत संघाचा कोणताही विचार नसल्याचं समोर आलं आहे. 

रैना हा धोनीचा सर्वात खास मानला जातो आणि जर एखाद्या खेळाडूचे कर्णधाराशी चांगले संबंध असतील तर फक्त रैना. अशा परिस्थितीत त्याला वगळण्यात आल्यानंतर सर्व CSK चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी धोनी मॅनेटमेंटशी बोलत असल्याचं समोर आलं आहे. 

डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात मेगा ऑक्शन होणार आहे. या वेळी 20 कोटींपर्यंत बोली लागू शकते असाही कयास आहे. तर 2 संघ नवीन येत असल्याने तिथे सुरेश रैना जाणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

BCCI ने तयार केलेल्या शेड्युलनुसार 2 एप्रिल 2022 रोजी पहिला IPL चा सामना खेळवण्यात येईल. 10 संघ आणि 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर जून महिन्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. IPL 2022 चा पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे. 2022 च्या आयपीएलसाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे.