वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०साठी भारतीय टीमची घोषणा

वेस्ट इंडिज आणि भारतामधली पहिली टी-२० मॅच थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात येणार आहे.

Updated: Nov 4, 2018, 04:36 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०साठी भारतीय टीमची घोषणा title=

कोलकाता : वेस्ट इंडिज आणि भारतामधली पहिली टी-२० मॅच थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात येणार आहे. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारत कर्णधार विराट कोहली आणि धोनीशिवाय मैदानात उतरणार आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलंय. या मॅचसाठीच्या १२ खेळाडूंची बीसीसीआयनं घोषणा केली आहे. या टीममधला कृणाल पांड्या या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल हे जवळपास निश्चित आहे.

इंग्लंड दौऱ्यातल्या टी-२० सीरिजमध्येही कृणाल पांड्याची निवड झाली होती. पण त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती. मॅचच्या आदल्या दिवशी संध्याकाळी कृणाल पांड्यानं नेटमध्ये बॅटिंगचा सराव केला आणि बॉलिंगही केली. मागच्या ३ वर्षांमध्ये कृणाल पांड्यानं आयपीएलमध्ये मुंबईकडून, बडोदा आणि भारत ए कडून खेळताना चांगलं प्रदर्शन केलं आहे.

भारतीय टीम : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद