Team India: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपवर टीम इंडियाने नाव कोरलं. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. या वर्ल्डकपची फायनल वेस्ट इंडिजमध्ये आजोयित करण्यात आली होती. तर आता टीम इंडिया वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाली आहे. वेस्ट इंडिजवरून टीम इंडिया थेट दिल्लीमध्ये पोहोचली असून दिल्लीच्या एअरपोर्टवर चाहत्यांनी गर्दी केली होती. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी सर्व चाहते उत्सुक होते. जेव्हा एअरपोर्टवर रोहित शर्माने ट्रॉफीसह एन्ट्री केली तेव्हा एकच जल्लोष करण्यात आला. रोहितने देखील चाहत्यांसाठी ट्रॉफी उंचावून दाखवली. यानंतर कर्णधार लगेच बसमध्ये बसला. यानंतर सर्व टीम हॉटेलसाठी रवाना झाली.
#WATCH | Captain Rohit Sharma with the #T20WorldCup trophy at Delhi airport as Team India arrives from Barbados, after winning the T20I World Cup.
(Earlier visuals) pic.twitter.com/ORNhSBIrtx
— ANI (@ANI) July 4, 2024
बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ सकाळी दिल्लीत पोहोचला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती देखील शुक्ला यांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होईल. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे.
गुरूवारी भारतीय संघ विजयी परेड मुंबईत करणार आहे. यासाठी रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया.”