मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी (IPL 2023) सर्व फ्रँचायजी सज्ज झाले आहेत. सर्व फ्रँचायजींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला सोपवली आहे. चेन्नई सुपर किंग्सने ऑलराउंडर रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) रिटेन केलं आहे. सीएसके (Chennai Super Kings) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ipl 2023 retention csk confirmed ravindra jadeja playing ipl for chennai supar kings latest news)
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई पुन्हा एकदा आगामी हंगामासाठी तयार आहे. चेन्नईने आपली टीम निश्चित केली आहे. यासह सीएसके आणि जडेजा यांच्यात झालेल्या वादावर पडदा पडला आहे. धोनीने चेन्नई आणि जडेजा यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केल्याचं म्हटलं जात आहे.
चेन्नईने फ्रँचायजीने ट्विट करत जडेजाला रिटेन केल्याची माहिती दिलीय. चेन्नईने ट्विट केलेल्या फोटोत जडेजासह इतर खेळाडूही दिसत आहेत. "Bring it in, Super Kings!", असं ट्विट केलंय.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात 4 वेळा ट्रॉफी जिंकली. मात्र धोनीने आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी धोनीने कॅप्टन्सी सोडली. त्यामुळे जडेजाला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र जडेजाला कॅप्टन म्हणून आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे स्वत: जडेजाने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला 15 व्या मोसमात 14 पैकी 4 सामन्यातच विजय मिळवता आला होता.