IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 Shubman Gill Remark: आयपीएल 2023 च्या साखळी फेरीमधील अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्सच्या (GT Beat RCB) संघाने 6 विकेट्सने पराभूत केलं. गुजरातच्या या विजयाचा शिल्पकार ठरला सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill). विराट कोहलीने (Virat Kohli) सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतरही आरसीबीला या महत्त्वाच्या सामन्यात विजय न मिळवता आल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले. या विजयामुळे प्लेऑफ्समध्ये मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफाय झाला. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा गुजरातचा क्वालिफायरचा (CSK vs GT Qualifier) पहिला सामना आज चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर खेळवला जात आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्याआधीच चेन्नई आणि गुजरातच पाहिला क्वालिफायर सामना खेळणार हे निश्चित झालेलं. त्यामुळेच सामना संपल्यानंतर विजयाचा शिल्पकार ठरलेल्या गिलने चेन्नईविरुद्धच्या सामन्याबद्दल एक विधान केलं. याच विधानावरुन शुभमनला सीएसकेच्या चाहत्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यामध्ये शुभमन आणि विजय शंकरने तिसऱ्या गड्यासाठी 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप करत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवलं. या सामन्यातील सामनावीर पुरस्कारही गीलला देण्यात आल्या. सामन्यानंतर बोलताना गीलने सीएसकेविरुद्धच्या सामन्याबद्दल भाष्य केलं. "चांगली सुरुवात करुन मोठी खेळी करण्याला महत्त्व आहे. नशीबाने मला हे छान जमत आहे. मी कशी खेळी करतो हे मला ठाऊक आहे. प्रत्येक खेळाडूला आपली क्षमता ठाऊक असणं गरजेचं असतं. मला वाटतं आमच्याकडे त्यासाठी (चेन्नईच्या मैदानावरील सामन्यासाठी) उत्तम गोलंदाज आहेत. मला अपेक्षा आहे की चेन्नईमध्ये आम्ही सीएसकेविरुद्धचा सामना जिंकून सलग दुसऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश करु," असं शुभमने आरसीबीला पराभूत केल्यानंतर म्हटलं.
चेन्नईला चेन्नईच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यासंदर्भात शुभमने भाष्य केल्याने सीएसकेच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. गुजरातचा संघ उजवा वाटत असला तरी चेन्नईचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावरील दादा संघ असल्याची आठवण चाहत्यांनी शुभमनला करुन दिली. पाहूयात चाहते काय म्हणालेत...
1) हे शक्य नाही...
Wo to nahi ho payega.
— CSK(@Pkccckp) May 22, 2023
2) सीएसकेचं जिंकणार
Csk jeetega
— Abhinav singh (@Abhinav_tmk) May 22, 2023
3)ही प्रतिक्रिया ऐकून धोनी म्हणेल...
Le Dhoni to Gill after hearing this pic.twitter.com/56sABp1ukl
— Sarcastic Cowboy (@SarcasticCowboy) May 21, 2023
4) जास्त स्वप्न पाहू नकोस...
Jyada sapne maat dekh gill tum gilli ho jaoge
— Snehashish Paul (@SnehashishPaul7) May 22, 2023
5) हाच फॉर्म कायम ठेव म्हणजे झालं
Kash yeh form agge bhi rahe
Kyuki Prince abb King ban gaya hai logo ke mutabik— what India Loves (@whatindialoves) May 22, 2023
6) यंदा हे शक्य नाही
No This Time CSK
We are also for 5th— Subrajit Pradhan (@Subrajit_Tulu) May 21, 2023
7) शुभमनचा चेन्नईविरुद्ध शेवटचा सामना खेळला तेव्हा...
Last time when gill played against csk in finals let’s show him his real awkaat pic.twitter.com/ZtTWJKsulz
— peer haseeb (@haseebpeer6) May 21, 2023
8)अहमदाबाद फिरुन या...
Bhai tum log gol ghumke aao ahemdabad hote hue hum chennai se ahemdabad jate h
—Munis Qureshi(@Munisazizi) May 21, 2023
चेन्नई आणि गुजरातचे संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी तिन्ही वेळा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या संघाने चेन्नईवर मात मिळवली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या विजयाचा चौकार मारणार की चेन्नई इतिहास घडवून गुजरातला पराभूत करुन पाचव्यांदा चषक जिंकण्याच्या दिशेने अंतिम फेरीत प्रवेश करत एक पाऊल पुढे टाकणार हे पहिल्या क्वालिफायर सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.