मुंबई: सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने सुपरओव्हरमध्ये बाजी मारत सामन्यावर विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल दरम्यान झालेल्या सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये खूप चढाओढ पाहायला मिळाली.
हैदराबादचा बॉलर विजय शंकरच्या हातून बॉल सुटला आणि तो अजब पद्धतीनं पडणार त्याआधी ऋषभ पंतने हवेतच त्या बॉलला मारलं. पंतचा प्रतिसाद हा प्रतिसाद पाहून सर्वाजण आश्चर्यचकीत झाले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज विजय शंकरने 13व्या ओव्हरमध्ये 5 वा चेंडू टाकण्यासाठी जात असतानाच त्याच्या हातून बॉल सुटला आणि तो बाऊन्सर सारखा पडणार तेवढ्यात ऋषभ पंतने तो बॉल हवेतच उंचावरून टोलवला. ऋषभ पंतने डोक्यावरुन येणाऱ्या बॉलवर मारलेल्या विचित्र शॉटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
— Aditya Das (@lodulalit001) April 25, 2021
Vijay Shankar Special to Rishabh Pant #DCvsSRH #IPL2021 pic.twitter.com/tZNAzYhqer
— Vivek Sharma (@IMViiku) April 25, 2021
ऋषभ पंतने धावून तेवढ्या वेळात रन काढला आणि नंतर पंचांसोबत झालेल्या चर्चेनंतर तो नो बॉल असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे दिल्ली संघाला दोन रन मिळाले.
दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ऋषभ पंतने 37 धावांची खेळी केली आहे. 37 चेंडूमध्ये त्याने 37 धावा केल्या. त्याने एक षटकार आणि 4 चौकारही ठोकले. पंतने मारलेल्या विचित्र शॉटची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
दिल्ली विरुद्ध हैराबाद झालेल्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये मॅच टाय झाली. त्यामुळे सुपरओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये धवन आणि पंतने संघाला विजय मिळवून दिला. अक्षर पटेलनं 2 विकेट्स काढल्या.