सिडनी : ऑस्टे्लियाविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शतक झलकावले आहे. रोहीत शर्माने ७ फोर आणि ६ सिक्सच्या मदतीने ११० बॉलमध्ये शतक साजरे केले. रोहित शर्माचे वनडेतील २२ वे शतक आहे. २८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन गोल्डन डक (पहिल्याच बॉलवर) बाद झाला. तसेच अंबाती रायडूला देखील भोपळा फोडता आला नाही. कॅप्टन विराट कोहलीला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कोहली केवळ ३ धावावंर बाद झाला.
त्यानंतर आलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या सोबतीने रोहित शर्माने भारताचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी रोहित आणि धोनीमध्ये १३७ धावांची भागीदारी झाली. धोनी ५१ धावांवर बाद झाला. धोनीच्या वनडे कारकिर्दीतील ६८ वे अर्धशतकं होते. त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिक १२ धावांवर आऊट झाला. सध्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा स्कोअर ५ बाद २०२ आहे. यात रोहित शर्मा ११७ धावांवर नाबाद असून रविंद्र जाडेजा ८ धावांवर खेळत आहे. भारताला ३८ बॉलमध्ये ८६ धावांची गरज आहे.
त्याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये २८८ धावा केल्या. यात उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँड्सकाँम्ब यांच्या अर्धशतचकाचा समावेश आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी २ विकेट घेतले तर, रविंद्र जडेजाने १ विकेट घेतला आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून ही मालिका मह्त्वपूर्ण समजली जात आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर निवड समितीची बारीक नजर असणार आहे.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य चांगलेच अंगाशी आले आहे. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.