मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार टेस्ट मॅचच्या सीरिजच्या तिसऱ्या मॅचच्या तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची दाणदाण उडालेली दिसली. मयंक अगरवाल आणि ऋषभ पंत नॉट आऊट राहिलेत. खरं म्हणजे, आजचा संपूर्ण दिवस दोन्ही टीम्सच्या बॉलर्सच्या नावावर राहिला. एकाच दिवशी तब्बल १५ विकेटस् घेतल्या गेल्या. भारत: ५४/५ (२७ ओव्हर्स)
दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसतंय. भारताला अवघ्या ४४ रन्सवर ५ विकेट गमवाव्या लागल्यात. भारताची दमदार सुरुवात करण्याच्या उद्देशानं हनुमा विहारी आणि मयंक अगरवाल मैदानात उतरले... पण, हनुमा विहारी ४५ बॉल्समध्ये १३ रन्स काढून तंबूत परतला. हनुमानंतर मैदानात उतरलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना भोपळाही फोडता आला नाही. दोघांचीही पॅट कमिन्सच्या बॉलवर मार्कस हॅरिसनं कॅच घेतली... तर अजिंक्य रहाणेही अवघा १ रन देऊन बाद झाला. रोहितची हेझलवुडच्या बॉलवर शान मार्शनं कॅच घेतली आणि तोही केवळ ५ रन्स बनवून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून एकट्या पॅट कमिन्सनं ४ विकेट घेतल्या. तर जोश हेझलवुडनं एक विकेट घेतली.
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान चार टेस्ट मॅचच्या सीरिजच्या तिसऱ्या मॅचच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्रात पहिला डाव आटोपलाय. पहिल्या इनिंगमध्ये २९२ रन्सनं पुढे असूनही भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन खेळवण्याऐवजी दुसऱ्या डावात पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सनं एकच धम्माल उडवून दिली. भारताकडून एकट्या बुमराहनं सहा विकेटस् घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्केस हॅरिस आणि टीम पैनी सर्वात जास्त म्हणजे २२-२२ रन्स काढण्यात यशस्वी ठरले. ऍरॉन फिन्च, मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क यांना तर दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. त्यांनी कसेबसे अनुक्रमे ८, ९ आणि ७ रन्स काढले. ऑस्ट्रेलिया १५१-१० (६६.५ ओव्हर्स)
ऑस्ट्रेलयानं ऍरॉन फिन्च २४-१, मार्कस हॅरीस ३६-२, उस्मान ख्वाजा ५३-३, शॉन मार्श ८९-४, ट्रॅव्हिस हेड ९२-५, मिचेल मार्श १०२-६, पॅट कमिन्स १३८-७, टीम पैनी १४७-८, नॅथन लायन १५१-९ आणि जोश हेझलवुड १५१-१० अशा विकेट गमावल्यात.
भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा विकेट घेतल्या तर रवींद्र जडेजानं २ आणि ईशांत शर्मा-मोहम्मद शमीनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
रवींद्र जडेजानं मिचेल मार्शचा विकेट घेतला. ही ऑस्ट्रेलियाचा सहावी विकेट ठरली. मिचेल मार्श ३६ व्या बॉलवर एका चौकाराच्या मदतीनं केवळ ९ रन्स काढून उपकॅप्टन अजिंक्य रहाणेला कॅच देऊन बसला.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ७ बाद ४४३ धावांचा डोंगर रचलाय. मयंक अग्रवाल, विराट कोहली, रोहित शर्माची अर्धशतकं आणि चेतश्वर पुजाराचं खणखणीत शतकाच्या जोरावर भारतानं आज दिवसभर कांगारुंच्या गोलंदाजांची पिसं काढली. संयम आणि वेग याचा उत्तम मिलाफ आज भारतीय फलंदाजांच्या खेळात बघायला मिळाला. चेतश्वर पुजारानं १०६ धावा काढल्या. तर विराट कोहली ८२ धावांची बहुमोल खेळी केली. अजिक्य राहणे आणि रोहित शर्मा या दोन्ही मुंबईकरांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताची धावसंख्या साडे तीशनेच्या पलिकडे नेली. राहणे बाद झाल्यावर रिषभ पंतनं धावांचा रतीब कायम राखला. अखेर पंत आणि जडेजा तंबूत परतल्यावर विराट कोहलीनं सरप्राईज देत डाव घोषित केला.