India Vs West Indies : भारतीय संघ 6 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात स्टार सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) खेळणार नाहीये. तर कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) पुनरागमन झाले आहे. आता बीसीसीआयने टीम इंडियामध्ये (Team India) एका स्टार फलंदाजाची एंट्री केली आहे, जो हार्दिक पांड्यासारखा खेळण्यासाठी ओळखला जातो. हा स्टार खेळाडू काही चेंडूंमध्ये सामन्याची बाजू बदलू शकतो.
डोमेस्टीक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऋषी धवनचा (Rishi Dhawan) बीसीसीआयने राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये समावेश केला आहे. धवन हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो फलंदाजी आणि गोलंदाजी मारण्यात तज्ञ आहे. सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी ऋषी धवन अहमदाबादला रवाना झाला आहे. ऋषी धवनचा संघात समावेश होताच भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये बळ मिळाले आहे. भारतीय संघातील कोणताही खेळाडू जखमी झाल्यास ऋषी धवनला खेळण्याची संधी मिळू शकते.
ऋषी धवन हा अतिशय स्फोटक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या 2020-21 हंगामात अप्रतिम खेळ दाखवला. ऋषी धवनने 8 सामन्यात 458 धावा आणि 17 विकेट घेतल्या आहेत. धवनमुळेच हिमाचल प्रदेश संघाने पहिल्यांदाच डोमेस्टीक क्रिकेटमध्ये ट्रॉफी जिंकली होती. ऋषी धवननेही रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो.
टीम इंडियासाठी पदार्पण
ऋषी धवन याआधीही टीम इंडियाकडून खेळला आहे. 2016 मध्ये धवनने भारतीय संघातून पदार्पण केले होते. त्याने तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. या खेळाडूला वेस्ट इंडिज मालिकेत खेळण्याची संधी मिळाल्यास तो आपल्या खेळाने चांगली कामगिरी करुन दाखवू शकतो. तो हार्दिक पांड्याची पोकळी भरून काढू शकतो. ऋषी धवनमध्ये विकेटवर टिकून राहण्याची क्षमता आहे आणि तो मोठा डाव खेळण्यात माहीर आहे.
भारतीय T20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.
भारतीय एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
भारताचे वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने
6 फेब्रुवारी: पहिली वनडे (अहमदाबाद)
9 फेब्रुवारी: दुसरी वनडे (अहमदाबाद)
11 फेब्रुवारी: तिसरी वनडे (अहमदाबाद)
16 फेब्रुवारी: पहिली T20 (कोलकाता)
18 फेब्रुवारी: दुसरी T20 (कोलकाता)
20 फेब्रुवारी: तिसरी T20 (कोलकाता)